चर्चा:निकोलस कोपर्निकस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर येथे समाविष्ट करावा.

अभय नातू (चर्चा) ००:११, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


मिकोली कोपर्निकस किंवा निकोलास कोपर्निकस या नावाचे लॅटिनीकरण होऊन हे नाव आले आहे. पोलिश (प्रशियन) ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती, धर्मोपदेशक आणि वैद्य. पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना त्यांनी रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओ यांची दुर्बिण, केल्पर यांचे गतीविषयीचे नियम व न्यूटन यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम यांना चालना मिळाली. म्हणून ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक मानले जातात.

त्यांचा जन्म व्हिश्चला नदीच्या तीरी असलेल्या टॉर्न (मध्य पोलंड) येथे झाला. त्याचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषांत झाले. फ्रेको विद्यापीठात त्यांनी वैद्यक व धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले (१४९१–९४) १४९६ साली ते कॅनन लॉच्या (धर्मविषयक कायद्याच्या) अभ्यासासाठी बोलोन्या (इटली) येथे गेले. तेथेच त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी अध्ययनही केले (१४९६–१५००). १५०० साली पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्र व गणित यांवर व्याख्याने दिली. त्यांची १४९७ सालीच फ्राउएनबुर्ख (फ्रॉमबर्क) येथील कॅथीड्रलचे कॅनन म्हणून नेमणूक झालेली होती.

टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली भूकेंद्रीय कल्पना (पृथ्वीविश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना) कोपर्निकस यांना अपुरी वाटत असे. या कल्पनेनुसार सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गतीसंबंधीचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे ही सुसंगत अशी नव्हती. याकरिता दुसरीच कल्पना मांडायला हवी, असे कोपर्निकस यांचे मत होते. इ.स.पू. ३०० मध्ये ग्रीकांनी सूर्यकेंद्रीय कल्पना (सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना) मांडलेली आढळते. बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले. या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना मांडली. मात्र त्यांची कल्पना व हल्लीची सूर्यकुलासंबंधीची कल्पना यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार मानून विश्वासंबंधीची (सूर्यकुल) कल्पना मांडली होती. तीनुसार सूर्य हा मध्य असलेल्या निरनिराळ्या एककेंद्रीय वर्तुळांत स्वस्थ गोल फिरत असतात. चंद्रासह पृथ्वी अशा एका वर्तुळात फिरत असते व तिला स्वतःभोवती फिरण्यास चोवीस तास व सूर्याभोवती फिरण्यास एक वर्ष लागते.