Jump to content

प्रभाकर देशकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पं. महामहोपाध्याय प्रभाकर देशकर (इ.स. १९२८ - १० एप्रिल, इ.स. २०१२:नागपूर, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक होते. त्यांनी कट्यार काळजात घुसली या सह अनेक संगीत मराठी नाटकांत गायनासह अभिनय केला आहे.

नागपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर देशकर यांनी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाची संगीत अलंकार पदवी मिळविली. त्यांनी प्रारंभी पं. शंकरराव सप्रे, त्यानंतर गायनाचार्य पं. शंकरराव प्रवर्तक आणि त्यानंतर डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले होते.

पूर्वी बुटी संगीत महाविद्यालय व नंतर भाऊसाहेब शेवाळकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या संगीत महाविद्यालयाचे प्रभाकर देशकर हे १९६९ पासून प्राचार्य होते. नागपूर दूरदर्शन आणि आकाशवाणीचे ते अ श्रेणी कलाकार होते. इ.स. २०१४ मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त झालेला कार्यक्रम हा त्यांचा संगीताचा शेवटचा कार्यक्रम होता.

प्रभाकर देशकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारती (स्थापना इ.स. १९८१) या ललित कला विषयक अखिल भारतीय संस्थेत संगीत विभागाचे प्रमुख होते.

भूमिका असलेली मराठी नाटके

[संपादन]
  • असं झालच कसं
  • अस्मिता
  • कट्यार काळजात घुसली
  • गड आला पण सिंह गेला
  • संगीत पारितोषिक
  • पंख लाभले आज स्वरांना
  • पंख हवे मज
  • संगीत मखमली हे स्वप्न माझे
  • संगीत वहिनी
  • शिवाई


प्रभाकर देशकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयातर्फे २००५ मध्ये बेळगाव येथे संगीत महामहोपाध्याय ही उपाधी मिळाली.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ज्येष्ठ गायक पुरस्कार
  • ऑस्ट्रेलियातील विंडसर कार्पोरेशनच्या महापौरांतर्फे सिडनेला प्रशस्तीपत्र
  • नागपूर महापालिकेतर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक म्हणून सन्मान, वगैरे. आदी पुरस्कार त्यांना मिळाले.
  • नागपूर विद्यापीठातर्फे जीवन साधना उपाधी सन्मान
  • मध्यप्रदेश सरकारतर्फे बैजू बावरा संगीत सन्मान
  • महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट कंठ पुरस्कार