Jump to content

तेरेसा (तैवानी गायिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेरेसा (२९ जानेवारी, १९५३ - ८ मे, १९९५:चॅंग मे, थायलॅंड) ही एक तैवानी गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कॅंटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप्रियता मिळाली. सन १९७४मध्ये तिचा जपानी गाण्यांचा आल्बम निघाला. सन १९८३मध्ये जेव्हा तिला लास व्हेगासमधील 'सीझर्स पॅलेस' येथ सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली.

तेरेसाचे स्वतःचे १००हून अधिक गाण्यांचे आल्बम आहेत. यांशिवाय तिची गाणी ५००हून अधिक आल्बम्समध्ये समाविष्ट झाली आहेत. तेरेसा ही आशियातील तैवान, हॉंगकॉंग, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडमध्ये आणि इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. तिचे चाहते एक कोटीहून अधिक आहेत.

८ मे १९९५ रोजी ती थायलॅंन्डमध्ये दम्याच्या विकाराने मरण पावली. तैवान सरकारने तिला दफन करून तिचे मोठे स्मारक बांधले.