तालग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तालग्राम (अपभ्रंश:ताला) हे छत्तीसगढ राज्यामधील एक गाव आहे.या ठिकाणी शिवमंदिर व अन्य शिल्पे/मंदिरे आहेत.[१]

हे ठिकाण बिलासपूर-रायपूर रस्त्यावर सुमारे ३० कि.मी. अंतरावर, रस्त्यापासून सुमारे ४ कि.मी. आत पूर्व दिशेला आहे.या ठिकाणी तीन मंदिरांचा एक समूह आहे.त्यांची नावेपण खास आहेत:

  • १. जेठानी मंदिर
  • २. देवरानी मंदिर
  • ३. जगमोहन मंदिर

या मंदिरसमुहाचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.येथे सुमारे २० फुटाचे स्तंभ आहेत व त्यावर अप्रतिम नक्शीकाम आहे.तेथे एका मोठ्या शिळेवर कोरलेल्या सूर्यकमळाची प्रतिमा व त्यास दर्शविण्यात आलेली आभा फारच सुंदर आहे. हे चिन्ह बिलासपूर विद्यापिठाने बोधचिन्ह म्हणून स्वीकारले आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]