बेलाव्हिया
| ||||
स्थापना | ५ मार्च १९९६ | |||
---|---|---|---|---|
हब | मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ | |||
विमान संख्या | २८ | |||
गंतव्यस्थाने | ५० | |||
पालक कंपनी | बेलारूस सरकार | |||
मुख्यालय | मिन्स्क, बेलारूस | |||
संकेतस्थळ | http://belavia.by/ |
बेलाव्हिया बेलारुशियन एरलाइन्स (बेलारूशियन: Белавія; रशियन: Белавиа) ही बेलारूस देशाची ध्वजवाहक व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. बेलाव्हियाचे मुख्य कार्यालय मिन्स्क शहरात आहे.[१] यांची कायदेशीर संयुक्त स्टॉक कंपनी आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये १०१७ कर्मचारी आहेत.
इतिहास
[संपादन]सन ७ नोवेंबर १९३३ रोजी प्रथम बेलारशियन एर टेर्मिनल, मिंस्क या शहरात उघडले. पुढील वसंत ऋतु मध्ये, थ्री पीओ-2 एरक्राफ्ट हे मिंस्क शहरात लँड झाले. हे एरक्राफ्ट बेलारशियन एर फ्लीट यांचे पहिले एरक्राफ्ट झाले. सन १९३६ मध्ये, मिन्स्क आणि मॉस्को दरम्यान पहिला नियमित हवा मार्गाची स्थापना करण्यात आली. सन १९४० च्या उन्हाळ्यात बेलारूसी नागरी विमान वाहतूक गट अधिकृतपणे स्थापना केली होती.[२]
ठिकाणे
[संपादन]मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ येथून आशिया, युरोप आणि आफ्रिका ह्या खंडांमध्ये बेलाव्हिया विमानसेवा पुरवते. याशिवाय चार्टर फ्लाइट्स ते लीझर ठिकाणे आणि व्हीआयपी चार्टरस यांना बेलाव्हिया संचालन करत असे.[३]
फेब्रुवारी २०१६ पर्यंत : बेलाव्हिया एरलाइन्सचे खालील गंतव्ये सेवा[४] :
एशिया
[संपादन]सेंट्रल एशिया : कझाख्स्तान, तुर्क्मेणिस्तान वेस्टर्न एशिया : आजारबईजन, सीपृस, जॅर्जिया, इराण, इस्राइल, लेबनॉन, टर्की
यूरोप
[संपादन]ऑस्ट्रीया, बेलारूस, झेच रिपब्लिक, फिनलँड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, इटली, लात्वीया, लिथुयनीया, नेदरलँडस, पोलँड, रशिया, सरबिया, स्पेन, स्वीडन, स्वीत्झर्लंड, यूक्रेन, यूनायटेड किंग्डम
कायदेशीर सहयोग करार
[संपादन]बेलाव्हिया एरलाइन्सने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.(आतापर्यंत - नोवेंबर २०१५)[५]
- एर फ्रांस
- एर बाल्टिक
- औस्ट्रियन एरलाइन्स
- क्झेच एरलाइन्स
- एतिहाद एरवेझ[६]
- फिन्नईर
- केएलएम
- एलओटी पॉलिश एरलाइन्स
- एस सेवेन एरलाइन्स
- यूक्रेन इंटरनॅशनल एरलाइन्स
सध्याचा विमान संच
[संपादन]मे २०१६ अखेर, खालील विमान संच होता.[७]
एर क्राफ्ट | सेवेत असणारी | मागणी | प्रवासी | टिपा | ||
---|---|---|---|---|---|---|
बिझनेस क्लास | इकॉनॉमी क्लास | एकूण | ||||
बोईंग 737-300 | ८ | — | — | १४८ | १४८ | |
बोईंग 737-500 | ३ | — | ८ | ११२ | १२० | |
२ | ८ | ११५ | १२३ | |||
१ | var | var | १३८ | |||
बोईंग 737-800 | ३ | २ | — | १८९ | १८९ | |
बॉंबार्डिये CRJ100 | १ | — | — | ५० | ५० | |
बॉंबार्डिये CRJ200 | ४ | — | — | ५० | ५० | |
एम्ब्राएर 175 | २ | — | १२ | ६४ | ७६ | |
एम्ब्राएर 195 | २ | — | ११ | ९६ | १०७ | |
एकूण | २६ | २ |
ऐतिहासिक विमान संच
[संपादन]एरक्राफ्ट | नोट्स |
---|---|
एनटोनोव एन-10 | |
एनटोनोव एन-24 | सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले |
एनटोनोव एन-26 | सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले |
आयआययूशिन आयआय-86 | सन १९९४-१९९६ मध्ये EW-86062, ex СССР-86062, RA-86062 ते एटलांट-सोयुज एरलाइन्स; वापरले होते. |
तुपोलेव तु-124 | |
तुपोलेव तु-134A | |
तुपोलेव तु-154B | "एक प्रशिक्षण मोक-अप म्हणून वापरले होते |
तुपोलेव तु-154B1 | "रद्द |
तुपोलेव तु-154B2 | "६ रद्द , एमएसक्यू येथे ९ संग्रहीत, एक प्रशिक्षण मोक-अप म्हणून वापरले होते |
याकोलेव याक-40 | सन १९९८ मध्ये मिन्स्क्वियाने विकत घेतले |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "बेलाव्हिया एरलाइन्स संपर्क".
- ^ "बेलाव्हिया एरलाइन्सची सेवा". 2015-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-13 रोजी पाहिले.
- ^ "मिंस्क आंतरराष्ट्रीय विमानतळ बद्दल".[permanent dead link]
- ^ "बेलविया एरलाइन्स ३२ नवीन ठिकाणी गंतव्ये सेवा सुरू करणार".
- ^ "बेलविया एरलाईन्स सोबत कायदेशीर सहयोग करार करणाऱ्या विमान कंपनी".
- ^ "इतिहाद एअरवेजनी बेलविया एरलाईन्स सोबत कायदेशीर सहयोग करार केला".
- ^ "बेलाव्हिया एअरलाइन्सच्या विमान संच बद्दल". 2021-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-13 रोजी पाहिले.