धरम का चाँद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धरम का चॉंद हे पं. आनंद प्रसाद कपूर यांनी लिहिलेले भक्त ध्रुवाच्या कथानकावरील हिंदी नाटक होते. बलवंत संगीत मंडळी या नाटकाचा प्रयोग करीत असे.

या नाटकाचा पहिला प्रयोग नागपूरला एप्रिल १९१८मध्ये झाला. या नाटकात बालनट गणू (गणपतराव मोहिते) बाळ ध्रुवाचे काम करी. उत्तानपाद राजाचे काम चिंतामणराव कोल्हटकर यांनी केले होते., ध्रुवाच्या सख्ख्या आईचे-सुनीतीचे काम कृष्णराव कोल्हापुरे यांनी आणि सावत्र आईची-सुरूचीची भूमिका दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती.

‘धरम का चॉंद’ची गाणी खूप गाजली. गंमत म्हणून ‘बलवंत’ने त्या गाण्यांची एक पद्यावली छापली आणि एका प्रयोगाच्या वेळी विक्रीला ठेवली. पद्यावल्यी विकून कंपनीना हजार रुपयांची प्राप्ती झाली. या नाटकात संगीत तर होतेच शिवाय नृत्य आणि ट्रान्सफर सीन्स होते; ते लोकांना खूप आवडत.

हैदराबादचे ‘पंतप्रधान’ राजबहादूर किसनप्रसाद यांच्या आग्रहामुळे हैदराबादला ‘बल्वंत’ने ‘धराम का चॉंद’चा प्रयोग केला. त्या प्रयोगापूर्वी राजबहादूर किसनप्रसादांनी ‘बलवंत’ला आहेराचे एक मानतबक पाठवले, त्यात उत्तम शालजोडी, भरजरी टोपी आणि चार ‘अशरफ्या’ (एक तोळे वजनाची सोन्याची हैदराबादी नाणी) होत्या.