माणिक मराठे
Appearance
माणिक मधुकर मराठे (इ.स. १९४३ - फेब्रुवारी, २०१६:पुणे) या पुण्यात कर्वेनगर येथे राहणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होता. एर कमोडर मधुकर मराठे हे त्यांचे पती आणि क्रीडा पत्रकार वि.वि. करमरकर हे त्यांचे थोरले बंधू होत.
श्रीमती मराठे यांनी दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीमध्ये आठ हजाराहून अधिक पुस्तके तयार केली होती. उत्तराखंडातील पूरग्रस्तांसाठी आणि जम्मूमधील विस्थापित हिंदू मुलींसाठी त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या.