सूर्यकांत ( - २२ ऑगस्ट, इ.स. १९९९) या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी नाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.
सूर्यकांत मांढरे यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यातील सहकारनगर येथील भीमसेन जोशी कलादालनाचा एक भाग होते. सूर्यकांत यांच्या चित्र कलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाथी ज्या वस्तू मांढरे कुटुंबीयांनी पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या, त्या या कलादालनात ठेवल्या आहेत. त्यांची नीट देखभाल होत नसल्याचे आढळल्याने या वस्तू आता सूर्यकांत माढरे यांच्या नावाच्या एका स्वतंत्र कलादालनात स्थानांतरित करण्यात येणार आहेत. (२३-२-२०१६ची बातमी). हे नवीन कलादालन पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या आवारात उभारण्यात येणार आहे.