ओकायामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओकायामा (जपानी:岡山市) हे जपानच्या ओकायामा प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.

ओकायामामधील कोराकु-एन ही जपानी पारंपारिक बाग आहे. पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.

इतिहास[संपादन]

इ.स. १६००च्या सुमारास ओकायामाच्या आसपासचा प्रदेशातील शेतजमीन व कुरणांमधील वस्तीला महत्त्व आले व त्यातून हे शहर निर्माण झाले. इ.स. १८८९मध्ये शहराची अधिकृत स्थापना झाली परंतु त्याआधी इ.स. १८७१मध्येच या शहरास ओकायामा प्रांताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे लश्करी तळ होता. २९ जून, इ.स. १९४५ रोजी अमेरिकेच्या वायुसेनेने केलेल्या तुफान बॉम्बफेकीत १,७०० व्यक्ती ठार झाल्या व हे शहर जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झाले होते.