Jump to content

साचा चर्चा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी ही माहितीचौकट तयार केली आहे पण ती काम करत नाही. मी ती ईगलनेस्ट अभयारण्य या पानामध्ये वापरली पण तिथे माहितीचौकाट दिसत नाही. कृपया या संदर्भात मदत करावी. त्याचबरोबर, ज्याप्रमाणे https://en.wikipedia.org/wiki/Eaglenest_Wildlife_Sanctuary या पानामधील माहितीचौकटीमध्ये भारताच्या नकाशामध्ये या अभाराण्याचे स्थान लाल ठिपक्याने दर्शवले आहे आणि खाली त्याचे coordinates सुद्धा दिले आहेत, तसे मराठीत या साच्याने कसे करायचे?
-- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ०१:४५, २२ जानेवारी २०१६ (IST)[reply]

नमस्कार,
तुम्ही केलेले रूपांतर फक्त साच्याच्या वापराबद्दलची माहिती आहे. मूळ साच्याचे रूपांतर करायचे राहिले आहे.
हा साचा किचकट साच्यांपैकी एक आहे. यात इतर अनेक उपसाच्यांचा वापर केला गेलेला आहे. हे उपसाचे आधी आयात करून मग हा साचा तयार करावा लागेल. मी यासाठी थोडा प्रयत्न करून बघतो.
अभय नातू (चर्चा) ०१:५८, २२ जानेवारी २०१६ (IST)[reply]

आपल्या प्रयत्नांबद्दल खूप खूप धन्यवाद. पण अजूनही क्षेत्रफळ पॅरामीटरची किंमत देउनसुद्धा ते माहितीचौकटीत दिसत नाही. आणि नकाशाचे काम अपूर्ण आहे :) यासंदर्भातदेखील मदत करावी अशी विनंती. जसा आययूसीएन चा साचा वेगळा होता व तो आता इतर साच्यांमध्ये वापरला जाउ शकतो, तसेच जर एकदा नकाशाचा साचा बनवला तर तोही इतर अनेक माहितीचौकटींमध्ये वापरता येईल व लेख अधिक रंजक होतील. -- प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ००:१९, २३ जानेवारी २०१६ (IST)[reply]

या साच्यातील नकाशे वेगळ्या उपसाच्यातूनच येतात. तो साचाही क्लिष्ट आहे. इतर माहितीचौकट साच्यांतूनही नकाशे दिसतात. तेथील क्लृप्ती वापरता येते का हे ही बघण्याचा प्रयत्न चालू आहे. :-)
अभय नातू (चर्चा) ००:४०, २३ जानेवारी २०१६ (IST)[reply]