हस्तमैथुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


स्वतःच्या जननेंद्रियांना (शिश्न अथवा योनी) विविध प्रकारे उत्तेजित करण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात.[१] बहुतेक वेळा हस्तमैथुनाचा परिणाम लैंगिक उत्कटताबिंदू (इंग्रजी: Orgasm)गाठण्यात होतो. बहुतेक व्यक्ती स्वतःच्या हातांनी, किंवा इतर वस्तूंनी जननेंद्रियांचे घर्षण करून हस्तमैथुन करतात. सहसा 'हस्तमैथुन' शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वतःला लैंगिक उत्तेजित करणे असा होतो. काही वेळा दोन व्यक्तींनी हस्तमैथुनासारख्या क्रिया एकमेकांच्या जननेंद्रियांवर करून, दुसऱ्यास लैंगिक उत्कटता मिळवून देण्याच्या क्रियेस सामायिक हस्तमैथुन असे म्हणतात. (इंग्रजी: Mutual masturbation)

पौगंडावस्थेत येताच मुलांमध्ये व मुलींमध्ये हस्तमैथुन करण्याची इच्छा नैसर्गिकपणे निर्माण होते. काहीवेळा लैंगिक स्वप्न पडून स्वप्नामध्ये वीर्यस्खलन होऊ शकतं. या सर्व गोष्टी अनेक मुलांमध्ये घडतात. त्यात अघटित असं काही नाही व त्यापासून काही अपायही होत नाही.[२] लैंगिक उत्तेजना दाटली गेली की तिची वाट मोकळी व्हावी म्हणून निसर्गानेच या रचना ठेवल्या आहेत. हस्तमैथून म्हणूनच कुणाकडून शिकावं लागत नाही. अत्यंत स्वाभाविकपणे मुलं ते शोधून काढतात. असं करण्याने त्यांना कोणताही शारीरिक अथवा मानसिक अपाय होत नाही. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. असह्य होत असलेल्या लैंगिक उत्तेजनेला शांत करण्यासाठी जर मुलं हस्तमैथुनाचा अवलंब करीत असतील तर त्यात काहीच गैर नाही. पण नेमकं यालाच गैर, घातक असल्याचं सांगितलं गेल्यास मुलं निसर्गाने योजलेला हा सोपा मार्ग अवलंबण्यास टाळू लागतात. पण मग त्याचा परिणाम हिंसक प्रवृत्ती निर्माण होण्यास होऊ लागतो. काही मुलांमध्ये या व अशा गोष्टींबद्दल प्रचंड न्यूनगंड निर्माण होतो. मुलांमधील हा न्यूनगंड दूर करायचा असल्यास त्यांच्याशी मोकळी व उघड चर्चा करणं गरजेचं असतं.

‘लैंगिकतेचा विकास होत असताना‘ वयाच्या १३-१४ वर्षांपासून, शाळांमधून किंवा पालकांकरवी लैंगिक शिक्षण दिल्याने मुलांमध्ये लैंगिकतेबाबत एक प्रांजळ स्वीकार निर्माण होतो, हे आज जगभर झालेल्या प्रयोगाअंती सिद्ध झालेलं एक वैज्ञानिक सत्य आहे. मुला-मुलींमध्ये वयात आल्यावर होणारे बदल हे जर त्यांना आधीच ज्ञात असतील तर त्या अवस्थेतून जात असताना मुलं त्याचा सहज व स्वाभाविकपणे स्वीकार करायला शिकतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, लैंगिक शिक्षण दिल्यानंतर मुलांमध्ये नको ते धाडसी प्रयोग करण्याची प्रवृत्ती कमी होते व जबाबदार लैंगिक संबंध ठेवण्याचं वय होईपर्यंत थांबण्याचं ‘मनोबल‘ त्यांना प्राप्त होतं. योग्य सूत्रांकडून योग्य माहिती मिळाल्यामुळे चुकीच्या माध्यमातून विकृत माहिती मिळवण्याची प्रवृत्तीही लोप पावते. अशा मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती निर्माण होत नाही.

लैंगिक शिक्षण म्हणजे जननेंद्रियांशी केंद्रीत प्रजनन प्रक्रियेची माहिती पुरवणं एवढंच नसून लैंगिकतेच्या मानसिक व भावनिक पैलूंची समग्र माहिती देणं, स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील मूलभूत फरक समजावून देणं, लैंगिक विकासाच्या सर्व अवस्थांचं शास्त्रोक्त विवरण करणं, जबाबदार लैंगिक वर्तन कशाला म्हणतात याचा अर्थ समजावून सांगणं, या सर्व गोष्टी त्यात येतात.

प्रौढ व्यक्तींपैकी ८० ते ९० टक्के लोक कधीना कधी हस्तमैथुन करतात हे अनेक पाहण्या व शास्त्रिय संशोधनातून दाखवून दिले आहे. वैवाहिक जोडप्यापैंकी देखील अनेकजण हस्तमैथुन करतात हे सर्वमान्य आहे.

व्युत्पत्ति

हस्त (हात) मैथुन (प्रणय) म्हणजेच हात वापरून केलेला प्रणय ही शास्त्रसंमत संज्ञा आहे. त्याशिवाय मूठ मारणे, हातगाडी, 'आपला हात जगन्नाथ', इत्यादी शब्द सर्वसाधारण जनतेत वापरले जातात. इंग्रजी भाषेत हस्तमैथुनला मॅस्टर्बेशन अथवा मास्टर्बेशन असे संबोधतात.

पद्धती

लैंगिक जागेवर बोटांनी किंवा उशीसारख्या वस्तूने दाब देणे किंवा चोळणे ही पद्धत स्त्री आणि पुरूष दोघेही सामान्यतः वापर करतात. त्याशिवाय पाश्चात्य देशात व्हायब्रेटर सारखी सयंत्रेसुद्धा उपलब्ध असतात. एका हाताने हस्तमैथुन करताना स्वतःच्या दुसऱ्या हाताने स्वतःची स्तने किंवा गुद्द्वारा सारखी इतर संवेदनशील अंगही बरेच जण स्पर्श करून किंवा चोळून आनंद घेतात. अधिक आनंद मिळावा म्हणून बरेच जण तेलादी तत्सम पदार्थांनी मसाज करून घेतात.

पुरुष आपल्या हाताच्या मुठीत शिश्नाचे वरील टोक जरा सैलसर धरून, शिश्नाच्या कातडीचे घर्षण होईल अश्या रितीने मूठ वरखाली करून हस्तमैथुन करतात. दुसरी एक पद्धत म्हणजे दोन हातांच्या पंज्यांमध्ये शिश्न धरून मळण्यासदृष्य क्रियेने हस्तमैथुन केले जाते. ताठ झालेले शिश्न चक्राकार फिरवून ही हस्तमैथुन करता येते. यापद्धती स्नानगृहात स्नानाच्या वेळीही वापरता येतात.

त्या शिवाय पोटावर निजलेल्या स्थितीत मांडीखाली शिश्न ठेवूनही मांडीने मर्दन करूनही हस्तमैथुन करता येते. यास्थितीत स्त्री जोडीदार असल्यास स्त्री जोडीदार पुरूषांच्या नितंबावर स्वतःची पुच्ची घासत सामायिक हस्तमैथुनाचा आनंद घेतला जावू शकतो. तसेच, स्त्री स्वतःच्या हाताने अथवा स्तनांनी शिश्नमर्दन करूनही किंवा पुरूष हस्तमैथुन करत असताना त्याच्या शिश्नाखाली/केसात/पाठीवर/नितंबावर हात ठेवून जोडीदार पुरूषास साहाय्य करू शकते.

स्त्रिया सर्व साधारणत: आपल्या पहिल्या किंवा मधल्या किंवा दोन्ही बोटांनी उल्वेस (योनीस) चोळतात किंवा योनिच्या आत बोटे अगर इतर काही वस्तू घालून दाण्याला (जीस्पॉट) चोळून हस्तमैथुन करतात.सामायिक हस्तमैथुनात जोडीदाराच्या हाताने पुच्चीस चोळून घेऊनही हस्त मैथुन करून घेतले जाते.

हस्तमैथुन करणे बहुतांश व्यक्ती नैसर्गिकपणे शिकतात. परंतु, चुकीच्या माहितीमुळे काही धोकादायक पद्धतींचा अवलंब केल्याने कायमस्वरूपी शारीरिक इजा होणे शक्य आहे व अश्या घटना घडतात. त्यामुळे अश्या अनैसर्गिक पद्धतींचा अवलंब करताना घ्यावयाची काळजी ह्याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हस्तमैथुन करताना लोक कामुक स्वप्नरंजन, वाचन, दृश्य किंवा आठवणीत रमतात त्यात अयोग्य काही नाही. काही जण स्वतःला बांधून घेण्यासारख्या अवघड तांत्रिकता किंवा अघोरी पद्धती आणण्याचा प्रयत्न करतात ते मात्र धोकादायक असून जिवावरही बेतू शकते. जननेंद्रियांजवळील त्वचेशी संपर्क येता तेथून जिवाणू अथवा विषाणू शरिरात शिरण्याची शक्यता इतर अवयवांपेक्षा जास्त असते. त्यामुळे हस्तमैथुन करताना स्वच्छता बाळगणे महत्त्वाचे आहे. योनी अथवा गुदद्वारामध्ये बोटे घालताना बोटे स्वच्छ धुतलेली असावीत. नखे काढलेली असावीत. बोटांऐवजी इतर कोणतीही वस्तू वापरताना ती टोकेदार नाही ह्याची खात्री करून घ्यावी. गुदद्वाराची नैसर्गिक रचना ही कोणतीही वस्तू आत खेचून ठेवणे ह्यादृष्टीची असते, त्यामुळे बाहेर चटकन काढता येणार नाही अश्या लहान वस्तू गुदद्वारामध्ये कधीही घालू नये. मलनिःसारणच्या क्रियेमुळे गुदद्वाराद्वारे लैंगिक जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे गुदद्वाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क आल्यास धुण्याची काळजी घ्यावी.

स्त्री आणि पुरूष लैंगिक चरमोत्कर्ष होण्याच्या आधी थोडी संथगती घेऊन पुन्हा वेग वाढवून अधिक काळ आणि जोरकस चरमोत्कर्ष करून घेऊ शकतात. क्वचित काही जण चरमोत्कर्ष होण्याच्या किंवा स्ख्लीत होण्याच्या किंचीत आधीच हस्तमैथुन बंद करतात अशावेळी पेल्वीक कंजेशनमुळे थोडी अस्वस्थता वाटू शकते. विल्हेम रीच या ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञाने 'कन्सर्निंग स्पेसिफीक फॉर्म ऑफ मॅस्ट्रूबेशन' या १९२२ साली लिहिलेल्या निबंधात हस्तमैथुन पद्धतींची प्रशस्त आणि अप्रशस्त प्रकारात मांडणी करण्याचा प्रयत्न केला. विरूद्धलिंगी व्यक्तीबद्दल असलेल्या आकर्षणाचे प्रमाण व लैंगिक मनोबल यांचा त्याने हस्तमैथुनाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

शिश्न ताठरता

शिश्नाला ताठरता येणं ही एक हेमो-डायनामिक (रक्ताच्या गतीशीलतेने होणारी) प्रक्रिया आहे. शिश्नामध्ये तीन नलिका असतात. या नलिकात असंख्य स्पंजी पेशीजाल असते आणि भरपूर रक्तवाहिन्या असतात. शिश्नातील रक्तवाहिन्या रक्ताने भरल्यावर स्पंजी पेशीजालचे आकारमान वाढते आणि नलिका लांब प्रसरण पावतात. लैगिंक विटपासंबंधीचे स्नायु आकुंचन पावतात आणि शिश्नाला ताठरता येते. ताठरलेल्या शिश्नाचा कठीणपणा/कडकपणा हा शिश्नांतील रक्ताचे प्रमाण आणि शिश्नाच्या मुळाशी असलेल्या, पेरीनियम भागातील लैंगिक स्नायूंच्या आकुंचनावर अवलंबून असते. जर दोन्ही पैकी एक घटक किंवा दोन्ही घटकांचे अपेक्षित कार्य झाले नाही तर ताठरता (तितकी) कठीण नाही असे दिसते वा अनुभवास येते.

कोणत्याही क्षणी हस्तमैथुन केले की त्यावेळी शुक्राणू पिंडात असलेल्या शुक्रांणूचे पतन होते. या पिंडाचे अस्तरामध्ये सातत्याने वीर्यनिर्मिती होत असते. वीर्यपतन झाल्याने, पिंड रिकामे होवून वीर्य निर्मितीला चालना मिळते. अशाप्रकारे हस्तमैथुनमुळे शुक्राणूची/वीर्याची निर्मिती घटण्याऐवजी वाढण्यास उत्तेजना मिळते.

वीर्यपतन

वीर्यचे कार्य, उत्पादन ह्याबाबतीत अनेक गैरसमजुती प्रचलीत आहेत, ज्यातील काही म्हणजे, जैवशक्ती म्हणजेच वीर्य आणि त्यामुळे स्वप्नदोष किंवा रात्री वीर्यपतन होणे म्हणजे जैवशक्तीचा नाश होय ही संपूर्ण कल्पनाच अशास्त्रीय आहे आणि त्या बाबतचे गैरसमज दूर व्हायलाच हवेत.

शुक्राणू पिंडाच्या अस्तरात तयार होणारे वीर्य हे जैविकद्रव्य आहे. संभोग अथवा हस्तमैथुन कोणत्याही कारणाने वीर्यस्खलन झाल्यानंतर पुन्हा आपोआप नवीन वीर्य तयार होते. वीर्यनिर्मितीची ही प्रक्रिया पुरुषांमध्ये वयात आल्यापासून ते मृत्यूपर्यंत कायम होत असते.

हस्तमैथुनापूर्वी आणि नंतर जननेंद्रीये आणि हातांची स्वच्छता करणे जरूरी असते विशेषतः स्त्री पुरूष जोडीदाराच्या हाताने हस्तमैथुन करून घेत असल्यास जोडीदाराच्या हाताची नखे काढलेली असणे तसेच त्याचे हात स्वतःच्या वीर्याने भरलेले नाहीत हे आरोग्य आणि अनपेक्षित प्रजनन टाळण्याच्या दृष्टीने चांगले असते.

पुरूषांनी त्यांच्या शिश्नाची त्वचा खाली सरकवून साबण आणि पाण्याने शिश्नाची स्वच्छता वेळोवेळी घेणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकता असते.

हेसुद्धा पहा

संदर्भयादी

अधिक वाचन


  • Brody, Stuart. "Slimness is associated with greater intercourse and lesser masturbation frequency" Journal Of Sex & Marital Therapy Volume 30, Issue 4, July - September 2004, Pages 251-261
  • DeMartino, Manfred F. Human Autoerotic Practices. New York: Human Sciences Press, 1979. ISBN 0-87705-373-1.
  • Marcus, Irwin M. Masturbation: From Infancy to Senescence. New York: International Universities Press, 1975. ISBN 0-8236-3150-8.
  • Hurlbert, David Farley & Karen Elizabeth Whittaker. (1991). "The Role of Masturbation in Marital and Sexual Satisfaction: A Comparative Study of Female Masturbators and Nonmasturbators." Journal of Sex Education & Therapy, 17(4), 272–282.
  • Buddhist Sexual Ethics, by Winton Higgins

बाह्य दुवे