अपर्णा वेलणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अपर्णा वेलणकर या लोकमत दैनिकाच्या दीपोत्सव नावाच्या दिवाळी अंकाच्या संपादिका आहेत. त्या लेखिकाही असून त्यांनी अनेक अमराठी पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहेत.

पुस्तके[संपादन]

  • इमॅजिनिंग इंडिया (स्वतंत्र; या पुस्तकाला २००७ सालचा ज्ञानदीप पुरस्कार मिळाला आहे)
  • द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज (मूळ इंग्लिश, लेखिका : अरुंधती रॉय). या मराठी पुस्तकाला २००३ सालचा फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सचा पुरस्कार आणि साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.
  • परवाना (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
  • फॉर हिअर, ऑर टू गो? (स्वतंत्र)
  • ब्युटी क्वीन (मूळ इंग्रजी, लेखिका : इरा त्रिवेदी)
  • द ब्रेड विनर (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस) या मराठी पुस्तकाला २००३ सालचा जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार मिळाला आहे.
  • लेडीज कूपे (मूळ इंग्रजी, लेखिका : अनिता नायर) या मराठी पुस्तकाला २००५ सालचा रणजित देसाई मिळाला आहे.
  • शांताराम (मूळ इंग्रजी, लेखक : ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्‌स)
  • शौझिया (मूळ इंग्रजी, लेखिका : डेबोरा एलिस)
  • सिलेक्टिव्ह मेमरी (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
  • स्पाउज् - संसारसुखाचं रहस्य (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)
  • स्पीडपोस्ट (मूळ इंग्रजी, लेखिका : शोभा डे)