रेंबवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेंबवली हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात असलेले गाव आहे.

या गावचे पांडुरंग विठोबा चव्हाण-वळंजू यांनी आझाद हिंद सेनेमधून लढाईत भाग घेतला होता. तसेच महीपत सखाराम चव्हाण-वळंजू यांनी दुसऱ्या महायुद्धात युरोपात शौर्य गाजवून गाजवून अत्यंत सन्मानाचा व्हिक्टोरिया क्रॉस मिळविला.[ संदर्भ हवा ] येथील जिवाजी सदोजी वळंजू यांनी स्वतःच्या घरी साक्षरता शाळा स्थापन केली.

आख्यायिका[संपादन]

कोल्हापूरची महालक्ष्मी देवी इतिहास काळात येथे येऊन राहिली होती, असे सागतात. वाटुळ नामक गावाहून आलेल्या यमाजी चव्हाण या गृहस्थाने रेंबवलीत या देवीची आराधना सुरू केली. आज दहाव्या पिढीपर्यंत वळंजू हा या गावचा मुख्य वंश असून महालक्ष्मी हीच या गावची ग्रामदेवता आहे. वळंजू आडनावाच्या एका थोर योग्याने या गावची खोती (हक्क) ह्या चव्हाण वंशाला दिली. त्याची कृतज्ञता म्हणून वळंजू हे नाव स्वीकारले गेले. ह्या चव्हाण वंशाचे आडनाव आता वळंजू असे रुढ झाले आहे.