सरोजिनी देशपांडे
इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात सक्रिय असणाऱ्या लेखिकांमध्ये सरोजिनी देशपांडे या एक होत्या.
कालपक्ष
[संपादन]सरोजिनी देशपांडे यांचे ‘कालपक्ष’ हे पुस्तक म्हणजे आणीबाणीतील तुरुंगवासाची रोजनिशीच आहे. त्यात त्यांनी विविध पक्षांमधील स्त्री सत्याग्रहींच्या व्यथावेदनांचे व परस्पर सौहार्दाचे हृद्य चित्रण केले आहे. येरवडा येथे त्यांच्याबरोबर अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, सुमतीताई सुकळीकर, प्रमिलाबाई टोपले आदी मान्यवर नेत्या होत्या. त्यांच्या सहवासामुळे लेखिकेला येरवड्याचे दिवस सुवर्णाक्षराने नोंदवावेसे वाटले आहेत. त्यानंतर नागपूर जेलमध्ये असताना बिहारच्या सत्याग्रहात सक्रिय असलेल्या सुमनताई बंग यांचाही सहवास त्यांना मिळाला. बिहार जेलमध्ये सुमनताईंना आलेले अनुभव अंगावर काटे आणणारे आहेत. स्त्रियांना तुरुंगवासात किती हालअपेष्टा आणि अन्याय सहन करावा लागला; हे या पुस्तकातून कळते.
पुस्तके
[संपादन]- कालपक्ष
- युरोपच्या अंतरंगात
- सहप्रवासी