चर्चा:ग्रंथालयशास्त्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • ब्लॉग शिवाय तटस्थ संदर्भ उपलब्ध झाल्यास (प्राचार्य डॉ. ) 'सुनील पाटील' अथवा त्यांच्या ग्रंथालया विषयी भविष्यात लेख असू शकेल.ग्रामीण भागात संदर्भांची वानवा असते , आणि या अंगाने विकिपीडिया लेखन संकेतात लवचिकता कशा स्वरूपाची असावी या विषयी विकिपीडिया:उल्लेखनीयता येथे चर्चा करावी.(लेखनातील उपलब्ध केले गेलेले विकिपीडिया परिघातील सुयोग्य भाग सुयोग्य विभागात स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे. काही सुयोग्य भाग इतर बंधू प्रकल्पात स्थानांतरीत केले आहेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०७, २१ डिसेंबर २०१२ (IST)[reply]

==पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय== जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले. प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’