विकिपीडिया:दिनविशेष/सप्टेंबर २५
Appearance
- १९५९ - श्रीलंकेचे पंतप्रधान सोलोमन भंडारनायकेवर बौद्ध भिक्षू ताल्दुवे सोमरामाने प्राणघातक हल्ला केला ज्याने दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
- १९७७ - शिकागो मॅरेथॉनच्याची स्थापना झाली ज्यात सुमारे ४,२०० लोक सहभागी झाले.
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर (चित्रित) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाल्या.
जन्म:
- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट संघाचे नायक
- १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू:
- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
मागील दिनविशेष: सप्टेंबर २४ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २२