Jump to content

चर्चा:रायआवळा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रायआंवळा हे शुद्धलेखन बरोबर कि रायआवळा?

अभय नातू १२:०९, २५ जुलै २०११ (UTC)


याचा खुलासा J नीट तर्‍हेने करू शकतील असे वाटते.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:०५, २५ जुलै २०११ (UTC)

रायआंवळा हे शुद्धलेखन बरोबर कि रायआवळा?

[संपादन]

http://www.plantnames.unimelb.edu.au/Sorting/Phyllanthus.html

अनुसार खालील महिती आहे. MARATHI : हरपररेवडी Harapararevadi, Harparrevdi, रायआंवळा Rayamvala, Roi-avala.


रायआंवळा की राय आवळा

[संपादन]

आवळा हा शब्द संस्कृतमधील आमला या शब्दावरून आला. आमलामध्ये ‘म’ हा नासिक्य वर्ण आहे, त्याची आठवण म्हणून आवळामध्ये ‘आ’वर अनुस्वार देत असत. या अनुस्वाराचा केवळ अस्पष्ट उच्चार होत असल्याने मराठी महामंडळाने असले सर्व अनुस्वार १९६२च्या शुद्धलेखनाच्या नियमानुसार काढले. त्यामुळे आता आंवळाप्रमाणेच गांव(मूळ: ग्राम), नांव(मूळ: नाम), पांच(मूळ: पंच) या शब्दांतही अनुस्वार येत नाहीत. हिंदीत असले अनुस्वार चंद्रबिंदू म्हणून दाखविले जात असल्याने ते अजूनही आँवला लिहितात व उच्चारतात; आणि त्यामुळे त्या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग (Gaon, Sion प्रमाणे) Aonla असे होते. मराठीने व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे असे सर्व अर्धानुच्चारित अनुस्वार काढून टाकल्यामुळे सध्याच्या मराठीत रायआवळा असे अनुस्वार न देता लिहिणे भाग आहे....J १६:४५, २५ जुलै २०११ (UTC) .