सुधीर नरहर रसाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६ पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. रसाळ हे सन १९९० ते १९९३ या काळात औरंगाबाद विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे प्रमुख होते.[१]

ग्रंथसंपदा[संपादन]

  • कविता आणि प्रतिमा
  • कवितानिरूपणे
  • काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली
  • ना.घ. देशपांडे यांची कविता
  • मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्‍लेषण
  • मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्‍वरूप
  • मर्ढेकरांचे कथात्‍म आणि नाट्यात्‍म वाङ्मय
  • लोभस : एक गाव काही माणसंं (व्‍यक्तिचित्रे)
  • वाङ्मयीन संस्कृती
  • समीक्षक भालचंद्र नेमाडे
  • साहित्य अध्यापन आणि प्रकार : सहसंपादन (प्रा. वा. ल. कुलकर्णी गौरवग्रंथ)

पुरस्कार व मानसन्‍मान[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ प्रतिष्‍ठान (सुधीर रसाळ विशेषांक), मराठवाडा साहित्‍य परिषद, औरंगाबाद