कार्लोवित्झचा तह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कार्लोवित्झचा तह जानेवारी २६, इ.स. १६९९ रोजी ऑट्टोमान साम्राज्य व युरोपीय देशांत झाला.

सध्याच्या सर्बिया मॉन्टेनिग्रो देशातील सेम्स्की कार्लोव्ह्की(कार्लोवित्झ) या गावात ऑट्टोमान सेनापतीने पराभव कबूल केला आणि हंगेरी, ट्रान्सिल्व्हेनियास्लोव्हेनिया हे देश ऑस्ट्रियाला तर पोडोलिया पोलंडला दिले. डाल्मेशियामॉरिया व्हेनिसला मिळाले.

या तहाने ऑट्टोमान साम्राज्याची युरोपमधुन पीछेहाट सुरू झाली.