Jump to content

ज्योतिर्लिंग स्तोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्योतिर्लिंग स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची नावे, त्यांची स्थाने, आणि स्तोत्र पठण करण्याचे फळ सांगितले आहे.

ज्योतिर्लिंग स्तोत्र हे पुढील प्रमाणे आहे-

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशंच शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

या स्तोत्रानुसार ज्योतिर्लिंगांची नावे आणि स्थळे -

ज्योतिर्लिंगाचे नाव स्थळ
श्री सोमनाथ वेरावळ - गुजरात (सौराष्ट्र)
श्री मल्लिकार्जुन श्रीशैल्य - आंध्रप्रदेश
श्री महाकाळेश्वर उज्जैन- मध्य प्रदेश
श्री ओंकारेश्वर ओंकारेश्वर - मध्य प्रदेश
श्री वैजनाथ परळी - महाराष्ट्र
श्री भिमाशंकर भीमाशंकर - महाराष्ट्र
श्री रामेश्वर रामेश्वर - तामिळनाडू
श्री नागेश्वर औंढा नागनाथ - महाराष्ट्र
श्री विश्वेश्वर वाराणसी - उत्तर प्रदेश
श्री त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर - महाराष्ट्र
श्री केदारनाथ केदारनाथ - उत्तराखंड
श्री घृष्णेश्वर वेरूळ - महाराष्ट्र

हे स्तोत्र सायंकाळी व प्रातःकाळी पठण केल्यास सर्व पापांचा विनाश होतो, असे सांगितले आहे.