चर्चा:जन लोकपाल विधेयक मसुदा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जन लोकपाल विधेयक (अजून तरी) कोणत्याही निवडलेल्या विधिमंडळात विचाराधीन नाही. तरी याचे शीर्षक बदलून जन लोकपाल विधेयक प्रस्ताव असे करावे.

अभय नातू १४:५९, २२ ऑगस्ट २०११ (UTC)

सहसा विधेयक (अवांतर: विधिनियम = कायदा) म्हणजेच प्रस्तावित कायदा असल्याने, शीर्षकामध्ये कंसात 'प्रस्ताव' किंवा 'प्रस्तावित' असे खरोखरच लिहायची आवशयकता वाटते का ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५५, २२ ऑगस्ट २०११ (UTC)

विधेयक म्हणजे प्रस्तावित कायदा हे बरोबर. पण सहसा विधिमंडळासमोर प्रस्तावित किंवा तेथे विचाराधीन अशा प्रस्तावांनाच विधेयक म्हणले जाते. अण्णा हजारेंनी मांडलेला प्रस्ताव अजून तरी कोणत्याच विधिमंडळापुढे नाही, तरी त्याला कायदेशीर मान्यता अजून (प्रस्ताव म्हणून सुद्धा) नाही.

अभय नातू १५:५८, २२ ऑगस्ट २०११ (UTC)