Jump to content

रामदास पाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामदास पाध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
जोडीदार पत्नी अपर्णा


रामदास पाध्ये हे बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार आहेत.

मराठी भाषेतील आद्य नाटककार विष्णूदास भावे यांनी अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णूदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णूदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.