Jump to content

अहिल्या रांगणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहिल्या रांगणेकर (इ.स. १९२२; पुणे - इ.स. २००९; मुंबई) या मराठी राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाच्या नेत्या होत्या. साम्यवादी नेते भालचंद्र रणदिवे हे त्यांचे थोरले बंधू होते.

अहिल्याबाईंचा विवाह १९४५ साली साम्यवादी चळवळीतले त्यांचे सहयोगी पी.बी. रांगणेकरांशी झाला होता.[]

१९७५ साली आणीबाणीच्या काळात मृणाल गोऱ्यांच्या साथीने महागाई विरोधात आंदोलन छेडल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले होते. भारत-चीन युद्धकाळात त्यासुद्धा इतर साम्यवादी नेत्यांप्रमाणे नजरकैदेत होत्या.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

इतर ठळक नोंदी

[संपादन]
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग.
  • परळ महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा.
  • आणीबाणी काळांत अटक झालेल्या पहिल्या महिला आंदोलनकर्त्या.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सी.पी.आय.एम. चे संकेतस्थळ". 2009-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "CPI(M) pays homage to Ahilya Rangnekar". April 20, 2009. 2012-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ "The Pioneers: Ahilya Rangnekar". May 24-June 6, 2008. 2012-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-07 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)