जगदीप (अभिनेता)
जगदीप (अभिनेता) | |
---|---|
जगदीप (अभिनेता) | |
जन्म |
जगदीप (अभिनेता) २९ मार्च, १९३९ दतिया-मध्य प्रदेश |
मृत्यू |
२९ मार्च, १९३९ (वय −८२) मुंबई |
इतर नावे | सैयद इश्तियाक जाफरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | शोले |
अपत्ये | सहा |
जगदीप (२९ मार्च, १९३९ दतिया-मध्य प्रदेश; - ८ जुलै, २०२०, मुंबई) हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी आहे. त्यांनी ३००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.[ संदर्भ हवा ]
जगदीप यांनी अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटांद्वारे विनोदी भूमिकांस सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]
ए.व्ही.एम.चित्रपट निर्मिती कंपनीच्या चित्रपटांमध्ये जगदीप नियमित दिसू लागले. त्यांनी त्या कंपनीच्या पाच चित्रपटांत प्रमुख भूमिका असलेले चित्रपट केले. त्यांची विशेष गाजलेला अभिनय म्हणजे शोले चित्रपटातील सुरमा भोपाली.[ संदर्भ हवा ] त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमा भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते.[ संदर्भ हवा ]
अभिनेता जावेद जाफरी व नावेद जाफरी सह त्यांना सहा अपत्ये आहेत. नावेद व जावेद यांनी टी.व्ही.वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.[ संदर्भ हवा ]
जगदीप यांची भूमिका असलेले काही चित्रपट
[संपादन]- अंदाज अपना अपना
- अफसाना
- अब दिल्ली दूर नही
- कुरबानी
- दो बीघा ज़मीन
- फिर वही रात
- मुन्ना
- शहनशाह
- शोले
- हम पंछी एक डाल के, वगैरे