कच्छचे आखात हे भारताच्या पश्चिम सीमेजवळ कच्छ (Cutch) आणि सौराष्ट्र (काठेवाड) यांच्या मधल्या भागात आहे. कच्छचे रण (Runn) हे कच्छ आणि पाकिस्तानचा सिंध प्रांत यांच्या दरम्यान आहे. कच्छच्या रणाचा काही भाग वाळवंटी असून काही भागात दलदल असते. पावसाळा संपला आणि दलदल वाळून गेली की कच्छमधून पाकिस्तानला रणामधून खुष्कीच्या मार्गाने जाता येते. रणाच्या उत्तरेकडील मोठ्या वाळवंटी प्रदेशाची पूर्व-पश्चिम लांबी १६० मैल, तर दक्षिणोत्तर रुंदी ८० मैल आहे. दुसरा भाग पहिल्याच्या दक्षिणेला आहे. हे दोन्ही भाग एकमेकांनाना निमुळत्या जमीनपट्टीने जोडलेले असून त्या दोम्ही भागांना एकत्रितपणे कच्छचे रण म्हणले जाते यापैकी उत्तरेकडील भागाचे क्षेत्रफळ सात हजार चौरस मैल व दक्षिण भागाचे क्षेत्रफळ दोन हजार चौरस मैल आहे. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा हे रण हा कच्छचा एक भाग होते. त्याचे प्रशासन ?) कच्छमार्फत चालवले जात होते. आताही आहे.
भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानात समाविष्ट झालेला सिंध प्रांत व भारतात राहिलेला कच्छ प्रदेश हे रणामुळे दुरावले गेलेले शेजारशेजारचे प्रदेश होते. कच्छचे रण/आखात हा कधीच सिंधचा भाग नव्हता. इसवी सन १८७२ ते १९४३ च्या सरकारी नकाशांत कच्छचे रण हा कच्छचा भाग असल्याचे दिसते.
कच्छचे आखात हे आता गुजरात राज्यातील आखात असून कांडला बंदर या आखाताच्या किनाऱ्यावर आहे. या आखातातील सगळ्यात खोल बिंदू समुद्रसपाटीखाली १२२ मीटर आहे.