Jump to content

उत्तंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तङ्कः (sa); উতঙ্ক (bn); Uttanka (en); उत्तङ्क (mr); Utangka (id); உதங்கர் (ta) sage in the Mahabharata (en); sage in the Mahabharata (en) Utanka (en); उत्तंक (mr)
उत्तङ्क 
sage in the Mahabharata
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
येथे उल्लेख आहे
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

उत्तंक ऋषी हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी आहेत. ते बैद नावाच्या ऋषीचे शिष्य होते. त्याच्य विद्यार्थिदशेतली एक कथा महाभारताच्या आदिपर्वात आहे. या कथेत असे सांगितले आहे की त्याच्या शिक्षणाच्या शेवटी उत्तङ्कास त्याच्या गुरूपत्नीने राजा पौष्याच्या राणीच्या कानातला दागिना गुरुदक्षिणा म्हणून मागितला. हा दागिना आणायला पौष्याकडे जात असताना उत्तंकाला हत्तीवर बसलेला एक पुरूष, एक चरखा चालविणारी सहा मुले, आणि त्या चरख्यावर काळ्या व पांढऱ्या धाग्यांने कापड विणणाऱ्या दोन स्त्रिया असे एक रहस्यमय दृष्य दिसते. हे दृष्य जीवनाचे रूपक मानले जाते. पौष्याकडून दागिना घेऊन गुरुगृही परतताना कुंडलांवर नजर ठेवून बसलेल्या तक्षक नागाने त्याला सतावले. त्यामुळेच उत्तंकाच्या मनात सर्ंपाविरूद्ध शत्रुत्व निर्माण झाले.

अर्जुनाचा नातू जनमेजय राजाने उत्तंकऋषींच्या साहाय्याने आपला पिता परीक्षितराजा याच्या मृत्यूच्या सूडासाठी सर्व सर्पांचा संहार करण्याकरीता सर्पसत्र केले अशी पुराणकथा आहे.

पुढे उत्तंक मारवाडच्या वाळवंटी प्रदेशात तपष्चर्येसाठी गेला. महाभारताच्या समाप्तीनंतरच्या काळात एकदा उत्तंकाला श्रीकृष्ण भेटला. त्याने श्रीकृष्णा्वर महाभारतातील संहाराला कारणीभूत झाल्याचा आरोप ठेवून जाब विचारला. श्रीकृष्ण निरुत्तर झाल्यावर उत्तंकाने श्रीकृष्णाला शाप देण्याच्या उद्देशाने ओंजळीत पाणी घेतले. श्रीकृष्णाची घाबरगुंडी उडाली. पण समयसूचकता दाखवत श्रीकृष्णाला उत्तंकाला समजावले आणि आपले विष्वरूप दाखवले. ते पाहून उत्तंक शांत झाला आणि त्याने श्रीकृष्णाला मारवाडच्या वाळ्वंटात पाणी मिळावे असा वर मागितला. श्रीकृष्णाने तुझी इच्छा होईल तेव्हा तुला पाणी मिळेल असा वर दिला.

याच उत्तंकाने धुंधू दैत्याच्या नाशासाठी कुवलाश्व राजाला मदत केली होती.