"हिंदु सेल्व्स इन अ मॉडर्न वर्ल्ड (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ''हिंदु सेल्व्स इन अ मॉर्डन वर्ल्ड: गुरु फेथ इन द माता अमरीतानंदमय... |
(काही फरक नाही)
|
१६:५०, २८ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
हिंदु सेल्व्स इन अ मॉर्डन वर्ल्ड: गुरु फेथ इन द माता अमरीतानंदमयी मिशन[१] हे माया वारियर[२] द्वारे लिखित व रुतलेज कर्झन साउथ एशियन रीलीजियस सिरीज प्रकाशनाद्वारे २००४ मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. या पुस्तकात माता अमरीतानंदमयी मिशन (MAM)[३] याच्या अभ्यासाद्वारे लेखिका एका बाजूला हिंदुत्वामधील अलीकडील व नाटयमय रुपात 'अवतार गुरु' या विकासावर भाष्य करते व त्याद्वारे समकालीन विश्वातील घडणाऱ्या घटनांचा परामर्श घेऊ पाहते.
माता अमरितानंदमयी मिशन
माता अमरितानंदमयी मिशन हि माता अमरितानंदमयी ज्यांना जनमानसात 'अम्मा'[४] या नावाने संबोधले जाते, द्वारे चालवली जाणारी गुरूच्या श्रद्धेवर आधारित संस्था आहे. 'अम्मा' या मुळच्या केरळातील असून खालच्या जातीतील आहेत. आज घडीला त्यांच्याकडे शहरी मध्यम वर्गीय भारतीय मोठ्या प्रमाणात आकर्षिले गेलेले आहेत. तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय अनुयायी सुद्धा आहेत.