हॅनिबल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
इटलीमध्ये सापडलेल्या हॅनिबलच्या संगमरवरी पुतळ्याचे चित्र
हॅनिबल (इ.स. पूर्व २४७ - इ.स. पूर्व १८३/१८२) हा अतिप्राचीन कार्थेजेनियन साम्राज्याचा लष्करी अधिकारी होता. हॅनिबलला आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम लष्करी पुढारी मानण्यात येते.
हॅनिबलच्या काळात भूमध्य भूभागात अत्यंत तणावाचे वातावरण होते. रोमन प्रजासत्ताकाने कार्थेज, सेल्युसिद साम्राज्य, सिराकुझा इत्यादी बलाढ्य सत्ताण्वर आपली ह्कुमत प्रस्थापित करण्यास सुरूवात केली. मोठ्या हत्तींचा समावेश असलेली एक संपूर्ण सेनेची तुकडी इबेरियापासून पिरेनीज व आल्प्स पर्वतरांगांमधून पार करून उत्तर इटलीमध्ये सुखरूप नेणे ही हॅनिबलची एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते. त्यानंतर हॅनिबलने इटलीमध्ये अनेक लढाया जिंकून तेथे सुमारे १५ वर्षे राज्य केले.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |