स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा
| ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (इंग्लिश: Statue of Liberty) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड वर उभारण्यात आलेली एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रिथ्यर्थ फ्रान्सकडुन अमेरिकेला भेट मिळालेल्या ह्या पुतळ्याचे २८ ऑक्टोबर १८८६ रोजी उद्घाटन करण्यात आले. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेउन उभ्या असलेल्या एका महिलेचा हा पुतळा अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यार्या पाहुण्यांचे स्वागत करतो.
जुन्या काळात युरोपातुन बोटीच्या मार्गाने अमेरिकेत स्थलांतर करण्यार्या लोकांना अमेरिकेचे पहिले दर्शन स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याद्वारे होत असे. आजही हा पुतळा अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.
१५१ फुट उंच असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या उजव्या हातात ज्योत असून डाव्या हातात पुस्तक आहे. त्यावर ४ जुलै १७७६ ("July IV MDCCLXXVI") ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख लिहिलेली आहे. पाया धरून याची उंची ३०५ फुट असून पुतळ्याच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत. ते जगातील ७ खंड दर्शवतात. उजव्या हातातील ज्योत प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक ज्ञान दर्शवते. १८७० मध्ये जुलेस जोसेफ लेफेब्व्रे चे painting 'ला वेरेत' च्या चित्राशी 'स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा' मिळतेजुळते आहे. २.४ mm च्या तांब्याच्या पत्र्यापासून हा संपूर्ण पुतळा बनवलेला असून आतून त्याला लोखंडाच्या/ स्टीलच्या पट्ट्यांचा आधार दिला आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] पुतळ्याचा तपशील
| वर्णन[१] | इंग्लिश एकक | मेट्रिक एकक |
|---|---|---|
| तांब्याच्या पुतळ्याची उंची | 151 फूट 1 इंच | 46 m |
| पायथ्यापासून मशालीच्या ज्योतीची उंची | 305 फूट 1 इंच | 93 m |
| पायापासून डोक्यापर्यंत उंची | 111 फूट 1 इंच | 34 मी |
| शीर | 16 फूट 5 इंच | 5 मी |
| तर्जनी | 8 फूट 1 इंच | 2.44 मी |
| दुसर्या जोडाचा परीघ | 3 फूट 6 इंच | 1.07 मी |
| हनुवटी ते शिरोभाग | 17 फूट 3 इंच | 5.26 मी |
| शिराची जाडी | 10 फूट 0 इंच | 3.05 मी |
| डोळ्यातील अन्तर | 2 फूट 6 इंच | 0.76 मी |
| नाक | 4 फूट 6 इंच | 1.48 मी |
| उजवा हात | 42 फूट 0 इंच | 12.8 मी |
| उजव्या हाताची जाडी | 12 फूट 0 in | 3.66 मी |
| मनगट | 35 फूट 0 in | 10.67 मी |
| मुख | 3 फूट 0 इंच | 0.91 मी |
| चबुतरा | 89 फूट 0 इंच | 27.13 मी |
| पायथा | 65 फूट 0 इंच | 19.81 मी |
| तांब्याचे वजन | 60,000 पौंड | 27.22 मेट्रिक टन |
| लोखंडाचे वजन | 250,000 पौंड | 113.4 मेट्रिक टन |
| एकूण वजन | 450,000 पौंड | 204.1 मेट्रिक टन |
| तांब्याच्या पत्र्याची जाडी | 3/32 इंच | 2.4 मी मी |
[संपादन] गॅलरी
-
Government poster using the Statue of Liberty to promote the sale of Liberty Bonds
-
Tourists aboard a Circle Line ferry bound for Liberty Island, June 1973
-
September 11, 2001: The twin towers of the World Trade Center burn with the Statue of Liberty in the foreground.
-
Reverse (coin)|Reverse]] side of a Presidential Dollar coin
[संपादन] संदर्भ
- ↑ Statistics. Statue of Liberty. National Park Service (2006-08-16). 2010-07-19 रोजी पाहिले.
[संपादन] बाह्य दुवे
- स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |