सूर्यसिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यसिद्धान्त हा खगोलशास्त्रावरील संस्कृत भाषेतला प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः सूर्याने मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. या सिद्धांताच्या एका हस्तलिखितांंत उल्लेख आहे कि सूर्य,असुुर मायाला साांगतो कि, ग्रीक-रोमन हे जगाचे प्रतिनिधित्व करीत असुन तु तेथे जा मी तुला हे ज्ञान यवानाच्या वेषात प्रकट करीन. खगोलशास्त्र व गणित यांचा शोध सगळ्यात आधी सुमेर संस्कृति ( नंतरचे मेसोपोटामिया) मधे साधारण ४००० ई.स. पू.च्या आसपास लागल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.सुमेर लोकांना गणित व ग्रह तारे, त्यांचे आकार व भ्रमण यांचे सखोल ज्ञान होते.भारतात वेदिक संस्कृति १५०० ई.स.पूर्व.नंतर आली व ऋवेद काळात आर्य हे विज्ञान क्षेत्रांत पारंगत असल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहित.त्यामुळे सुर्यसिद्धांत हा सुमेर संस्कृति व 'ग्रीक खगोलशास्त्रीय ग्रंथांची भारतीय आवृत्ती असावा असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धान्त, त्यांच्या ज्ञानाचा स्रोत म्हणुन सूर्यसिद्धांताचेलन्त आणि रोमक सिद्धान्त या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. वराहमिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात त्यांचा ज्ञानाचा स्रोत म्हणुन याच सूर्य सिद्धांतचे संदर्भ आहेत.

स्वरूप[संपादन]

एका वर्षात पृथ्वीच्या भ्रमणाला लागणारा काळ, याची अचूक माहिती या ग्रंथात नोंदवलेली आहे, ती ३६५.२५६३६२७ दिवस अशी आहे. ही माहिती आजच्या मान्यतेनुसार जवळपास अचूक आहे.

या ग्रंथात ग्रहगोल आणि त्यांचे आकारमान यांची माहिती आहे.

ग्रहांचे आकारमान -

  • शुक्र - सूर्यसिद्धान्तानुसार शुक्राचा व्यास ३००८ मैल आहे. आधुनिक खगोलशास्त्राची सद्य मान्यता म्हणते की शुक्राचे आकारमान ३०३२ मैल आहे.
  • शनी - त्याचप्रमाणे सूर्यसिद्धान्तानुसार शनीचा व्यास ७३८८२ मैल आहे. सध्याचा अंदाज ७४५८० मैलाचा आहे. म्हणजे दोन्ही आकड्यांत केवळ १ टक्क्याचा फरक आहे.

तसेच सूर्यसिद्धान्ताच्या गणित शाखेत ज्याजीवा यांचे संदर्भ किंवा मूळ दिसून येते. ग्रहणे आणि त्याची कारणे याचा ऊहापोहही या ग्रंथात आहे. एकूणच सूर्यसिद्धांत हा खगोलशास्त्रातील आद्य आणि अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. शेकडो वर्षांपासून बनणारी भारतीय पंचांगे या ग्रंथांतील तत्त्वांवर आधारलेली असतात. असे असले तरी, या ग्रंथाचा आवाका वैश्विक मितीचा आहे. या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बर्जेस या अभ्यासकाने सूर्य-सिद्धान्त अ टेक्स्ट-बुक ऑफ हिंदू अ‍ॅस्ट्रोनॉमी (इंग्लिश: Surya-Siddhanta: a text-book of Hindu astronomy ;) या नावाने इ.स. १८५८ साली केले. बापूदेव शास्त्री यांनी केलेले भाषांतर बिब्लिओथिका इंडिकांत छापले गेले. रेव्हरंड बर्जेस यांचे अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या सहाव्या पुस्तकांत १८६० सालीं छापले गेले आहे.

बाह्य दुवे[संपादन]