सूर्यनमस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ठ क्रमाने १० किंवा १२ योगासने करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात.

मूळ[संपादन]

हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

सूर्यनमस्कारांतील आसने[संपादन]

आसन श्वासक्रिया चित्र
प्रणामासन उच्छवास 1Pranamasana.JPG
हस्त उत्तानासन श्वास 2Urdva Hastasana.JPG
उत्तानासन उच्छवास 3Uttanasana.JPG
अश्व संचालनासन श्वास 4godhapitham (l‘iguane).JPG
चतुरंग दंडासन उच्छवास 5adho mukha shvanasana.JPG
अष्टांग नमस्कार रोखा 6Ashtanga Namaskara.JPG
भुजंगासन श्वास 7urdhva mukha shvanasana.JPG
अधोमुख श्वानासन उच्छवास 5adho mukha shvanasana.JPG
अश्व संचालनासन श्वास 4godhapitham (l‘iguane).JPG
१० उत्तानासन उच्छवास 3Uttanasana.JPG
१२ हस्त उत्तानासन श्वास 2Urdva Hastasana.JPG
१३ प्रणामासन उच्छवास 1Pranamasana.JPG

मंत्र[संपादन]

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे.

क्र. मंत्र चक्र
ॐ मित्राय नमः अनाहत चक्र
2 ॐ रवये नमः विशुद्धी चक्र
ॐ सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
ॐ भानवे नमः आज्ञा चक्र
ॐ खगाय नमः विशुद्धी चक्र
ॐ पूष्णे नमः मणिपूर चक्र
ॐ हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
ॐ मरीचये नमः विशुद्धी चक्र
ॐ आदित्याय नमः आज्ञा चक्र
१० ॐ सवित्रे नमः स्वाधिष्ठान चक्र
११ ॐ अर्काय नमः विशुद्धी चक्र
१२ ॐ भास्कराय नमः अनाहत चक्र

सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात
|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||

सूर्यनमस्कार व शरीरसौष्ठव[संपादन]

सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास

सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासुन सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे[१]. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.

शिवाजी महाराजसमर्थ रामदास सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. सूर्यनमस्काराचे महत्त्व, तो घातल्याने होणारे फायदे आणि सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत
  2. सुर्यनमस्काराचे मंत्र मराठीमाती
  3. इंग्रजीतून