सुमन कल्याणपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुमन कल्याणपूर

सुमन कल्याणपूर (जन्म जानेवारी २८, इ.स. १९३७ भवानीपूर, फाळणीपूर्व बंगाल) या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.

जीवन[संपादन]

सुमन कल्याणपूर यांच्या वडिलांचे नाव शंकरराव हेमाडी तर आईचे नाव सिताबाई होते. २७ एप्रिल १९५८ ला रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबद्ध.

सुमन कल्याणपूर यांची काही मराठी भावगीते[संपादन]

अ.क्र. गीत गीतकार संगीतकार
उठा उठा चिऊताई कुसुमाग्रज कमलाकर भागवत
जेथे जातो तेथे संत तुकाराम कमलाकर भागवत
केशवा माधवा रमेश अणावकर दशरथ पुजारी
शब्द शब्द जपुनि ठेव मंगेश पाडगावकर विश्वनाथ मोरे
नकळत सारे घडले रमेश अणावकर दशरथ पुजारी
आकाश पांघरूनी मधुकर जोशी दशरथ पुजारी
जुळल्या सुरेल तारा श्रीकांत पुरोहित दशरथ पुजारी
वाट इथे स्वप्नातील अशोकजी परांजपे अशोक पत्की
केतकीच्या बनी तिथे अशोकजी परांजपे अशोक पत्की
१० नाविका रे अशोकजी परांजपे अशोक पत्कीWiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.