Jump to content

विकिपीडिया:सद्य घटना विवरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सद्य घटना या पानावरून पुनर्निर्देशित)
  • इथे दिलेली वृत्ते त्रोटक व सर्वसमावेशक स्रोतांतून दिलेली असावीत. कोणत्याही एका स्रोतावर अवलंबून असू नये या दृष्टीने खालील स्रोतांचा उपयोग करावा. शक्यतो संदर्भ उद्धृत करावेत. कॉपीराइट छायाचित्रांचा उपयोग करू नये.वृत्तान्‍ताचे स्वरूप फक्त राजकीय असू नये अथवा भावना दुखावणारे असू नये.
  • इथे दिलेली बातमीवर इतर स्रोत तपासून मगच विश्वास ठेवावा .

सद्य घटना

[संपादन]

१० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला

[संपादन]

इ-सकाळने http://www.namami.org/ १० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला झाल्याची बातमी दिली आहे.दैनिक सकाळ म्हणते-- "भारताने आज १० लाख हस्तलिखितांचा "कीर्तिसंपदा' हा इलेक्‍ट्रॉनिक डाटाबेस तयार करून विश्‍वविक्रम नोंदविला आहे. या डाटाबेसमध्ये कौटिल्याचे अर्थशास्त्र, गीतगोविंद व बाबरनामा यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही समावेश आहे." ...... पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री अंबिका सोनी यांनी, "ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखी घटना आहे,' असे या डाटाबेसच्या उद्‌घाटन प्रसंगी येथे सांगितल्याचे दैनिक सकाळ म्हणते, त्यामध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील पाच हस्तलिखितांचा समावेश असल्याचेही दैनिक सकाळ नमूद करते. "नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट' या संस्थेने तयार केलेला हा डाटाबेस http://www.namami.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

[javascript:openWindow( "/esakal/02152007/71F7322A6D.htm") सौजन्य दैनिक इ-सकाळ]


'इट्स इम्‌मटेरिअल'या टाइम्स ऑफ इंडियाच्या अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपूर्ण उल्लेख

[संपादन]

टाइम्स ऑफ इंडिया चे वार्ताहार चिदानंद राजदत्त यांनी विकिपीडियाचे संस्थापक संस्थापक जिंबो वेल्स यांची भेट घेऊन भारतीय भाषिक मराठी,कन्नड आणि बंगाली विकिपीडियांच्या प्रगतीबद्दल माहिती घेऊन तिचा उल्लेख 'वेजेस ऑफ लँग्वेजेस' आपल्या लेखात केला , त्या पाठोपाठ राष्टीय प्रमुख दैनिक द हिंदूच्या वार्ताहार 'प्रीति जे.' यांनी पण 'से इट इन युवर लींगो' या लेखात भारतीय भाषातील विकिपीडियांची दखल घेतली. आता आजच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या अग्रलेखान जागतिक प्रभावी ब्रँड्सच्या यादीत गूगल,ॲपल, आणि यूट्युब या तिघांच्या पाठोपाठ विकिपीडिया एनसायक्लोपीडियाने चौथा क्रमांक पटकावल्याचा गौरवास्पद उल्लेख केला आहे.टाइम्स ऑफ इंडिया 'इट्स ईममटेरीअल' अग्रलेखात म्हणते की फक्त हे (गूगल,ॲपल,युट्यूब,विकिपीडिया) फक्त आंतरजालावरील तारेच नाहीत तर ग्राहकांच्या गरजा ओळखण्याचा आणि अंतिम उपभोक्त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासारखा कमिटमेंटचा मोठा विचार (बिग आयडिया) यात दिसून येतो.

गूगलची स्तुती करून टाइम्स ऑफ इंडिया पुढे म्हणते , विकिपीडियातर जवळजवळ उपयोगकर्त्या वाचकांनीच उभारला आहे, कल्पनेत शक्य असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल संशोधनपूर्ण माहिती देतो. 'आंतरजालावरील या आभासी संकल्पनांनी, लोकांवर मूर्त वस्तूंपेक्षा अधिक प्रभाव टाकला आहे.जागतिक व्यापारातील चढाव उतारात ज्यांना 'आयडियाशनल' बाजू असेल अशाच वस्तू पुढे जाऊ शकतील. 'आयडिया' जेवढी 'प्युअर' तेवढीच 'ब्रँडच्या यशाची खात्री अधिक.

सोप्या ,सुयोग्य व ग्राहकास मैत्रीपूर्ण वाटतील अशा सर्वकालीन मुद्यांचे महत्त्व या अग्रलेखात विषद केले आहे. हा अग्रलेख वाचकांकरिता इ पेपर सदरातसुद्धा उपलब्ध केला गेला आहे.

मराठी विकिपीडिया सर्वाधिक वाढणाऱ्या विकिंपैकी एक

[संपादन]

विकिपीडियाचे संस्थापक जिंबो वेल्स यांच्या मतानुसार मराठी, कन्नड व बंगाली विकिपीडिया ह्या त्यांच्या संकेतस्थळावरील सर्वाधिक वाढत जाणाऱ्या आहेत. मराठी विकिने नुकतेच ७००० लेखांचा आकडा पार केला. (स्रोत -टाईम्स ऑफ इंडिया- चिदानंद राजघाट्टा यांचा लेख)

The 10 most-cited Wikipedia entries

[संपादन]

[१]




Bengali Wikipedia catches up 10000 articles

[संपादन]

The Bengali Wikipedia, a web-based free-content multilingual encyclopaedia project, has crossed the landmark of 10,000 articles. It became the 50th language to do so and only the second from South Asia.

Telugu wikipedia is on the top spot with over 15,000 articles.[२]

Jimmy Wales, founder Wikipedia ,visits India

[संपादन]

More Indian languages on Wikipedia

IANS Friday, September 01, 2006 10:40 IST BANGALORE: More and more Indians can contribute to the volunteer-edited Wikipedia encyclopedia project, now rated among the top 20 websites globally.

मराठी विकीपीडियाचा वर्ग एक स्तुत्य उपक्रम

[संपादन]

१२ ऑगस्ट २००६ ला, महाराष्ट्र मंडळ (ममं) बे एरियाच्या वतीने श्री.अतुल तुळशीबागवाले आणि श्री.मिलिन्द भाण्डारकर यांनी, कॅलिफोर्नियातल्या सनिव्हेल नावाच्या गावात मराठी विकिपीडियाविषयी माहितीवर्ग घेतला. हा वर्ग महाराष्ट्र मंडळाच्या मंगळागौर कार्यक्रमाला संलग्न होता. त्यातच ममं ने उन्हाळ्यात येथे हमखास येणाऱ्या येथील संगणक तंत्रज्ञांच्या आईवडिलांसाठी एक संमेलन (ज्याला इंग्रजीत आपण गेट-टुगेदर म्हणतो) आयोजित केले होते. त्यामुळे मराठी आजी-आजोबांची संख्या अधिक, आणि मंगळागौरीचे खेळ खेळणाऱ्यांची कमी अशी परिस्थिती होती. आम्हालाही हेच हवे होते. कारण ह्या आजी-आजोबांचेच तर आम्हाला सहकार्य हवेय. त्यांना आपल्या मराठी संस्कृतीविषयी असलेली माहिती त्यांच्यासोबतच लुप्त होऊ नये, म्हणून तर मराठी विकिपीडियाचे प्रयोजन आहे.

मिलिन्द भाण्डारकर मनोगतवर पुढे म्हणतातः

"तर एकंदरीत कार्यक्रम (आमच्या अपेक्षेपेक्षाही) चांगला झाला. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आपल्या संस्थेत करायचा असल्यास आम्ही दोघे जिथवर चतुश्चक्रवाहन (ज्याला आपण मराठीत कार म्हणतो) चालवत येऊ शकू ( म्हणजे सॅन होझे पासून पन्नास मैलाच्या परिघात) तिथपर्यन्त येऊ. यापलीकडे तुम्ही तुमचे बघा. अतुलने एवढ्या कष्टाने तयार केलेले प्रेझेंटेशन आम्ही तुम्हाला मुक्त स्वरूपात वापरायला देतोय."

मराठी विकीपीडियाचा वर्ग

प्रेझेंटेशन

वाचावे असे काही

[संपादन]
  • न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर विविध न्यूज एजन्‍सी विकिपीडियाची दखल घेत आहेत.

न्युयॉर्क टाइम्स वरील बातमी

  • विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनी विद्यार्थिवर्गास विकिपीडीयाचे संदर्भ सशोधनात उद्‌धृत न करण्याचा सल्ला दिला.

[३] विदागारातील आवृत्ती

  • उमराव सभा [४]
  • महाराष्ट्राचा साक्षेपी शोध [५]



गुगल ट्रेंड तौलनिक

[संपादन]
  • हा विभाग तातपुरता येथे दिला आहे. चर्चापानावर चर्चा करून योग्य लेखात हलवावा. गुगल ट्रेंड हे संकेतस्थळ गुगल शोधयंत्राने होणारे तुलनात्मक शोध शब्दवापर दर्शविते. भारतात जेवढा मराठी शब्दशोध होतो तेवढा विकिपीडिया शब्दशोध होत नाही. marathi, maharashtra मधे maharashtra शब्दशोध जास्त होतो.

Hindi हा शब्द marathi पेक्षा खूप जास्त शोधला जातो. Font हा शब्द marathi पेक्षा थोडासाच कमी शोधला जातो.

वृत्तपत्रांमध्ये Times of Indiaचा शोध सर्वाधिक आहे.त्या पाठोपाठ Indian Expressचा क्रमांक लागतो. मराठी वृत्तपत्रात 'esakal'पेक्षा sakal शब्दाचा शोध अधिक होता. pudhari चा खूप अत्यल्प, तर samana चा शब्दशोध २००५ नंतर थंडावल्याचे दिसते. 2006 मध्ये Lokmat शब्दशोध सर्वांत पुढे आला आहे. sakal+esakal क्र.२वर जात आहेत, loksatta क्र.३वर दिसतो. तर Maharashtra Times चा आलेख देखील चढता आहे.

इतर मराठी संकेत स्थळांचा शब्दशोध गुगल ट्रेंडवर उपल्ब्ध होत नाही असे दिसते.

भारत व इंग्लंड मध्ये bombay शब्दशोध कमी होत असून mumbai अधिक होत असल्याचे आढळते.तर उत्तर अमेरिका खंडात bombay शब्दशोध अधिक आहे.pune पेक्षा poona चा वापर नगण्य आहे तर अमराठी शहरात nasik जास्त तर महाराष्ट्रात nashik,nasik शब्दशोध सारखाच होतो.

Mumbai चा सर्वाधिक त्याच्या ५०% pune तर nagpur च्या ५०% Aurangabad, nashik+nasik चे प्रमाण Aurangabadच्या बरोबरीने शब्दशोध होतो.त्या खालोखाल kolhapurचा शब्दशोध होतो.

ऐतिहासिक व्यक्तींमध्ये 'shivaji'चा शब्दशोध सर्वाधिक आणि खास करून कोल्हापुरच्या लोकांकडून होतो.'sai baba'शब्द मुंबई आणि इतर अमहाराष्ट्रीय शहरातून होतो. सध्याच्या हयात व्यक्तींत नावघेण्याजोगा शोध sachin,सचिन तेंडुलकर शब्दांचा होतो. पण कोल्हापूरकरमात्र सचिनपेक्षा 'शिवाजी' शब्द अधिक शोधत असतात.

संदर्भ

[संपादन]

मराठी वृत्तपत्रे बाह्य दुवे आणि बातमी स्रोत

[संपादन]

इथे दिलेले वृत्त सर्वसमावेशक स्रोलेले असावे या दृष्टीने खालील स्रोतांचा उपयोग करावा.

वृत्तसेवा

महाराष्ट्रातील दैनिक

प्रादेशिक आणि जिल्हानिहाय दैनिके आणि स्रोत

शासकीय स्रोत

[संपादन]

Extract of Terms of use for महाराष्ट्र शासन webpage

[संपादन]

महाराष्ट्र शासन वेबपेज वापरण्याचे नियम Content Disclaimer Though all the efforts have been made to keep the content on this website accurate and up-to-date, the same should not constructed as a statement of law or used for any legal purpose. All queries regarding the content of this website may be directed to Directorate of Information Technology (the postal as well as email address of the concerned department).

Copyright Material featured on this site may be reproduced free of charge in any format or media without requiring specific permission. This is subject to the material being reproduced accurately and not being used in a derogatory manner or in a misleading context. Where the material is being published or issued to others, the source must be prominently acknowledge. However, the permission to reproduce this material does not extend to any material on this site which is identified as being the copyright of the third party. Authorisation to reproduce such material be obtained from the copyright holders concerned.

अमराठी वृत्तपत्रे बाह्य दुवे आणि बातमी स्रोत

[संपादन]