षांतौ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षांतौ
汕头市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


षांतौ शहर क्षेत्राचे क्वांगतोंग प्रांतातील स्थान
षांतौ is located in चीन
षांतौ
षांतौ
षांतौचे चीनमधील स्थान

गुणक: 23°21′14″N 116°40′55″E / 23.35389°N 116.68194°E / 23.35389; 116.68194

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत क्वांगतोंग
क्षेत्रफळ २,२४९ चौ. किमी (८६८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६७ फूट (५१ मी)
लोकसंख्या  (२०२०)
  - शहर ५५,०२,०३१
  - घनता २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
  - महानगर १,२५,४३,०२४
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://shantou.gov.cn


षांतौ (चिनी: 汕头市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील क्वांगतोंग या प्रांतातले एक मोठे शहर आहे. षांतौ शहर क्वांगतोंगच्या पूर्व भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली षांतौ शहराची लोकसंख्या सुमारे ५५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी होती. १९व्या शतकात चीनच्या सर्वाधिक वर्दळीच्या बंदरांपैकी एक असलेले षांतौ विकासाच्या बाबतीत क्वांगचौ, षेंचेन इत्यादी महानगरांच्या तुलनेत मागे पडले. तरीही ते पूर्व क्वांगतोंग भागातील एक मोठे आर्थिक केंद्र आहे.

षांतौ रेल्वे स्थानक हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्गावर स्थित आहे. जियेंग चाओशान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • विकिव्हॉयेज वरील षांतौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). Archived from the original on 2021-10-21. 2021-10-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)