क्वांगचौ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| क्वांगचौ 广州市 |
|
|
|
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | क्वांगतोंग |
| स्थापना वर्ष | १९१८ |
| महापौर | झँग ग्वांगनिंग |
| क्षेत्रफळ | ७४३४.४ वर्ग किमी |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ३७ फूट |
| लोकसंख्या | |
| - शहर | ७६,०७,२०० |
| - घनता | १०२३ प्रति वर्ग किमी |
| प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
| http://www.gz.gov.cn | |
| चीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
क्वांगचौ (मराठी लेखनभेद: क्वांग्चौ ; चिनी: 广州 ; फीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कँटन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून क्वांगतोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हाँगकाँगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे क्वांगचौ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
क्वांगचौ चिनाच्य जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर क्वांगचौ महानगरी परिसराची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- क्वांगचौ नगरशासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी व इंग्लिश मजकूर)
- क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ - इंग्लिश आवृत्ती (इंग्लिश मजकूर)