श्रीपाद ब्रह्मे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीपाद ब्रह्मे हे एक मराठी ललित लेखक आहेत. त्यांची चित्रपट आणि चित्रपटसृष्टी या विषयावर दोन पुस्तके लिहिली आहेत. ते १९९६पासून वृत्तपत्र सदरांतून लेखन करत असताना त्यांनी २००३ पासून सिनेपरीक्षणे लिहायला सुरुवात केली. ब्रह्मे यांच्या एकूण ३०७ परीक्षणांपैकी निवडक ५० परीक्षणे त्यंच्या फर्स्ट डे फर्स्ट शो या पुस्तकात आहेत.

कौटुंबिक माहिती[संपादन]

ब्रह्मे यांच्या आईचे बालपण मराठवाड्यातल्या छोट्या-मोठ्या गावांत गेले. तिचे वडील बार्शी किंवा सोलापुरात नेऊन सिनेमे दाखवत असत. एकदा तिने सलग तीन शो पाहिले होते. ब्रह्मे यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये गेले. वडील एसटीत कामाला होते आणि एसटी स्टँडच्या समोर दत्त नावाचे टूरिंग टॉकीज होते. तिथे त्यांनी अनेक चित्रपट पाहिले.

चित्रपट परीक्षणे[संपादन]

ब्रह्मे यांना सिनेमांविषयी वाचायला आवडत असे. पुण्याला आल्यावर ते गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या वसतीगृहात राहत असताना जब्बार पटेलांचा मुक्ता या चित्रपटावर एक फुलस्केप पान भरून आपले पहिले परीक्षण लिहिले.

ब्रह्मे यांनी यानंतर रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारित्व विभागात पदवीशिक्षण घेतलीसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांना सिनेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. दैनिक सकाळमध्ये नोकरी करीत असताना कामाच्या निमित्ताने त्यांना फिल्म इन्स्टिट्यूट, फिल्म आर्काइव्ह येथे जाण्याची संधी मिळाली. याशिवाय त्यांनी पुण्यात भरणाऱ्या चित्रपट महोत्सवांतही चित्रपट पाहिले. काही काळानंतर त्यांनी सकाळमध्ये चित्रपट परीक्षणे लिहायला सुरुवात केली. ब्रह्मे यांनी आपले पहिले परीक्षण सप्टेंबर २००३ मध्ये अनाहत या चित्रपटाचे लिहिले. त्यानंतर त्यांनी सकाळमध्ये पुढील सात वर्षांत १७५ हिंदी आणि मराठी चित्रपटांची परीक्षणे लिहिली.

त्यानंतर ब्रह्मे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये चार वर्षे परीक्षणे लिहिली आणि मग ते स्वतःच त्यांतून निवृत्त झाले. डिसेंबर २०१४मध्ये प्रकाशित झालेले पीके चित्रपटाचे परीक्षण त्यांचे महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेले शेवटचे परीक्षण होते.

ब्रह्मे यांनी अकरा वर्षांत ३०७ चित्रपटांची परीक्षणे लिहिली.

पुस्तके[संपादन]

  • कॉफीशॉप (ललित लेखसंग्रह)
  • फर्स्ट डे फर्स्ट शो
  • यक्षनगरी

पुरस्कार[संपादन]

  • 'विकास इंडिया फाउंडेशन'चा स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय युवा पुरस्कार (२०१०)