विकिपीडिया:कारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान साचा:पान काढायची विनंती येथे तसेच साचा:delete अथवा साचा:पान विलिनीकरण विनंतीयेथे जोडले आहे. हा साचे {{पान काढायची विनंती}} किंवा {{delete}} असे लिहून संबधीत वगळणे योग्य पानांवर लावता येतात;अथवा {{पान विलिनीकरण विनंती}} .

मराठी विकिवरून काढायची विनंती केलेली पाने Speedy deletion requestsया categoryत वर्गीकृत होतात. सर्व साधारणता नवख्या व्यक्तिंना विकिपीडिया व तीच्या सहप्रकल्पांची ठीक कल्पना नसल्या मुळे अशा पानांची निर्मीती होते व विकिपीडियाचा दर्जा टिकवण्याच्या दृष्टीने अशी पाने वगळणे योग्य ठरते, ही पाने काढू नयेत म्हणून त्या-त्या पानाच्या 'चर्चापाना'वर सदस्यांकडून सूचना आल्या नाहीत, तर ही पान काढण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजून sysops ही पाने काही काळाने mr:Category:speedy deletion या categoryमध्ये हलवतील. त्यानंतरदेखील कोणाची काही हरकत त्या पानाच्या चर्चापानावर न आल्यास ते पान काढून टाकले जाते.वगळलेली पाने आपण वगळल्याची नोंदयेथे पाहू शकता.

आपण प्रथमताच येथे संपादन प्रयत्न करत असल्यास विकिपीडिया काय आहे आणि विकिपीडिया काय नाही आहे हे समजावून घ्या. आपल्याला उदाहरणा दाखल प्रायोगिक संपासदन करून पहावयचे असल्यास धूळपाटी येथे संपादन करून प्रात्यक्षीक करून पहा. सर्वसाधअरण पणे निम्नलिखीत कारणांनी पाने वगळली जातात:

  • अमराठी शिर्षक (मजकुर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शिर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
  • अप्रमाणित शीर्षक/संकेतास धरून नसलेले शिर्षक(मजकुर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शिर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
  • शिर्षकात अशुद्ध लेखन(मजकुर योग्य असल्यास शक्य तेथे पानाचे योग्य शिर्षकाखाली स्थानांतरण करण्यात येते)
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत
  • जाणीवपूर्वक केलेले अप्रस्तुत संपादन/लेखन (Spaming/Vandalism)
  • संपादन किंवा लेखन प्रताधिकार मुक्त नसलेले लेखन आहे असे सिद्ध होत असल्यास
  • अनावश्यक लेख
(या कारणाने वगळले जाणारे लेखांच्या वगळण्या बद्दल पुरेशी माहिती व अधिक कालावधी जोडलेली पाने तपासणे इत्यादी काळजी प्रबंधकांनी घेणे अपेक्षीत आहे)
  • आधीचे पान वगळून स्थानांतर केले
लेखवगळण्या पुर्वी येथे काय जोडले आहे हे पान तपासून सर्व संबधित पानात योग्य बदल घडवून मगच लेख/पान वगळले जातील याची दक्षता घ्यावी
  • अवैश्वकोशीय मजकूर


दक्षता

लेखन वगळण्यापुर्वी संपादक व प्रबंधकांनी घ्यावयाची काळजी

  • संपादकांनी लेख वगळण्याची विनंती करताना शक्यतो कारण व्यवस्थित लिहावे जेणे करून प्रथमच संपादन करणा‍र्यांचा येथील निर्णय प्रक्रिया अनपेक्षीत वाटणार नाही याची काळजी घ्यावी.
  • नवखी व्यक्ति मराठी भाषक असून अजाणते पणाने संपादन करत आहे असे आढळल्यास संपादक व प्रबंधकांनी {{Fasthelp}} , {{Fastfonthelp}}, {{Fonthelp}} हे साचे नवख्या व्यक्तिच्या चर्चा पाना वर आवर्जून लावावेत.
  • प्रबंधकांनी स्पॅमिंग सदृश्य सोडून इतर सर्व लेख वगळताना चर्चेची संधी देण्याकरिता पुरेसा कालावधी देऊन मगच लेख वगळावे
  • लेखवगळण्या पुर्वी येथे काय जोडले आहे हे पान तपासून सर्व संबधित पानात योग्य बदल घडवून मगच लेख/पान वगळले जातील याची दक्षता घ्यावी


लेख कसे असू नयेत

  • विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
  • विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
  • विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्‍तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश [[1]] आहे.
  • विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
  • विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
  • विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
  • विकिपीडियातील लेख धर्मादाय, व्यापारी वा व्यक्‍तिगत आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची जागा नाही.
  • विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
    • नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी नाही.
    • दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
    • विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
    • आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
    • पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
    • हे व्यक्‍ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
    • दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
    • चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
    • विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्‍त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
    • आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
    • पाठ्यपुस्तक नाही.
    • ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
    • संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
  • विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
  • विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्‍या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.


विकिपीडिया मदत मुख्यालय

मदतकेंद्र

Enable Marathi script
Input | Output | Help-forum for new users

विकिपीडिया-परिचय
आधारस्तंभ | विकिपीडियाची सफर

विकिपीडियाचे संपादन कसे करावे
विकिसंज्ञा | प्रकल्प

चर्चा
विकिपीडिया चावडी | नवागतांसाठी मदतकेंद्र

विकिपीडिया मदत लेखांची सूची

वैयक्‍तिक साधने