जटायू (रामायण)
रामायणानुसार, जटायू (संस्कृत: जटायु) हा गृध जातीचा एक पक्षी होता. गरुडाच्या पुतण्यापासून अरुणास झालेला पुत्र होता. अयोध्येचा इक्ष्वाकुकुलीन राजा दशरथ याचा जुना मित्र होता. रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न याने केला; पण रावणाने तलवारीने याचे पंख छाटून टाकले.
मतभेद [संपादन]
जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणारा पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध टोळीतील एक मनुष्यच होता, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे [१].
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ वर्तक,प.वि.. वास्तव रामायण. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||