युएफा चँपियन्स लीग
| युएफा चँपियन्स लीग | |
|---|---|
| खेळ | फुटबॉल |
| प्रारंभ | इ.स. १९५५ |
| प्रथम हंगाम | १९५५-५६ |
| संघ | ३२ (साखळी फेरी) ७६ (एकूण) |
| खंड | युरोप (युएफा) |
| सद्य विजेता संघ | |
| सर्वाधिक यशस्वी संघ | |
| संकेतस्थळ | संकेतस्थळ |
युएफा चँपियन्स लीग (अजूनही युरोपियन कप या नावाने प्रसिद्ध) ही युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स द्वारा आयोजित वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉल जगतात अत्यंत लोकप्रिय अशा या स्पर्धेचे जगभरात अदमासे एक अब्ज चाहते असावेत.
१९५५ साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव युरोपियन कप असेच होते. मात्र १९९२-९३च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चँपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चँपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. युएफा चँपियन्स लीग आणि युएफा युरोपा लीग भिन्न असून युरोपा लीग ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे.
सध्याचा (२०११-१२ हंगाम) चषक विजेता क्लब चेल्सी एफ.सी. आहे.
विजेते यादी [संपादन]
| अतिरिक्त वेळामध्ये विजय | |
| * | पेनल्टी शूटआउट वापरून विजय |
| & | पुनर्लढतीत विजय |