मिरोस्लाफ क्लोजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिरोस्लाव क्लोस या पानावरून पुनर्निर्देशित)
मिरोस्लाफ क्लोजे
FIFA WC-qualification 2014 - Austria vs. Germany 2012-09-11 - Miroslav Klose 01.JPG
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक ९ जून, १९७८ (1978-06-09) (वय: ३६)
जन्मस्थळ ओपोले, ओपोल्स्का प्रांत, पोलंड
उंची १.८२ मी (५)
मैदानातील स्थान स्ट्रायकर
क्लब माहिती
सद्य क्लब एस.एस. लाझियो
क्र ११
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
१९९८–१९९९
१९९९–२००४
२००४–२००७
२००७–२०११
२०११-
एफ.सी. ०८ होम्बुर्ग
१. एफ.से. काइझरस्लाउटर्न
वेर्डर ब्रेमन
बायर्न म्युनिक
एस.एस. लाझियो
0२० (११)
१२० (४४)
0८९ (५३)
0९८ (२४)
0८० (३५)
राष्ट्रीय संघ
२००१– जर्मनी 0१३३ (७०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २०१४.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून २०१४

मिरोस्लाफ जोसेफ क्लोजे (जर्मनपोलिश: Miroslav Josef Klose; जन्म: ९ जून १९७८) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. पोलंडमध्ये जन्मलेला व २००१ सालापासून जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा भाग राहिलेला क्लोजे आजच्या घडीला जर्मनीसाठी सर्वाधिक गोल नोंदवलेला फुटबॉल खेळाडू आहे. हा मान ह्यापूर्वी गेर्ड म्युलर कडे होता. क्लोजेने आजवर १३३ सामन्यांमध्ये ७० गोल केले असून त्याला २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल्डन बूट पुरस्कार मिळाला होता. त्याने २००२ फिफा विश्वचषकामध्ये ५, २०१० फिफा विश्वचषकामध्ये ४ तर २०१४ फिफा विश्वचषकामध्ये आजवर 2 गोल नोंदवले आहेत. एकूण १6 गोल नोंदवून तो विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱा फुटबॉलपटू एक आहे.

क्लब पातळीवर जर्मन बुंडेसलीगामध्ये अनेक संघांकडून खेळल्यानंतर क्लोजे २०११ पासून इटलीच्या सेरी आमधील एस.एस. लाझियो ह्या क्लबकडून खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]