मात्सुओ बाशो
मात्सुओ बाशो (जपानी भाषा: 松尾 芭蕉 ; रोमन लिपी: Matsuo Bashō ;) (इ.स. १६४४ - नोव्हेंबर २८, इ.स. १६९४) हा जपानच्या एडो काळातील प्रख्यात कवी होता. हायकाय नो रेन्गा या काव्यप्रकारातील रचनांसाठी बाशो त्याच्या काळी ख्यातनाम होता. आता काही अनेक शतकांच्या टीका व समीक्षणांनंतरही त्याच्या छोट्या व सुबद्ध हायकूंमुळे तो हायकू-कवींमध्ये अग्रणी मानला जातो. त्याच्या काव्यरचना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून जपानात अनेक स्मारकांवर व वारसास्थळांवर त्यांतील अवतरणे नोंदवली आहेत.
कार्य [संपादन]
मात्सुओ बाशो यांनी जपानी हायकू या काव्यप्रकारात अत्यंत सुबद्ध अशी रचना केली होती. उदा;古池や蛙飛込む水の音(जपानी कांजी)
ふるいけやかわずとびこむみずのおと (जपानी १७ हिरागानालिपीत भाषांतरित) फुरुइके या कावाझू तोबीकोमू मिझु नो ओतो (रोमाजी बांधणी )
स्पष्टीकरण :
फु-रु-इ-के या(५)
का-वा-झू तो-बी-को-मू(७)
मि-झु नो ओतो(५)
मराठी भाषांतरण :
जुना तलाव
त्यात बेडूक उडी घेतो
पाण्याचा आवाज..........
बाह्य दुवे [संपादन]
- क्लासिकल जॅपनीज डेटाबेस - बाशोच्या मूळ जपानी काव्यरचना व त्यांचे इंग्लिश अनुवाद (जपानी व इंग्लिश मजकूर)