मंगळवेढा
| ?मंगळवेढा महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
| गुणक: (शोधा गुणक) | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| भाषा | मराठी |
| तहसील | मंगळवेढा |
| पंचायत समिती | मंगळवेढा |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
मंगळवेढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.मंगळवेढा हा मंगळवेढे या नावाने सुद्धा ओळखला जातो. मंगळवेढा हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका ठिकाण आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] स्थान
सोलापूर पासून ५४ किलोमीटर तर दक्षिण काशी, पंढरपूर पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूर अतांग पसरलेले काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिद्ध आहे.
[संपादन] लोकसंख्या
२००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढ्याची लोकसंख्या सुमारे २१६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याची साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे.
[संपादन] भाषा
मंगळवेढ्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात.
[संपादन] भौगोलिक विविधता
मंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात.
[संपादन] पिके
प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सुर्यफूल ही पिके घेतली जातात.
[संपादन] हिंदू-मुस्लिम ऐक्य
मंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऎक्याचे प्रतिक, गैबीपीरचा दर्ग्याला मुस्लिमा बरोबरच हिंदु भाविक ही जातात. तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव, मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मि-दहिवडी या गावामधे सर्वधर्मिय दुर्गामाता नवरत्र महोत्सव् तरुण मन्डळ आहे. या मन्डळात सर्व समाजाचे (मुस्लिम्म, धनगर्, वडर, कैकाडी, महार, माग, चाभार्, कुम्भार्, सुतार, लोहार, पारधी, लिगायत वाणी) लोक एकत्र सर्व सण साजरे करतात. या तालुक्यातील मारोळी या गावामधे गैबीपीरचा दर्ग्याला मुस्लिमा बरोबरच हिंदु भाविक ही जातात.
[संपादन] शैक्षणिक संस्था
मंगळवेढ्यात इंग्लिश स्कुल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नुतन विद्यालय इ. प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालये आहेत. अनेक गुणवंत विद्यार्थी या मंगळवेढे नगरीने दिले आहेत, त्यातील अनेक विद्यार्थी विदेशातसुद्धा वास्तव्य करीत आहेत.
[संपादन] प्रशासन
मंगळवेढा हे जरी निमशहर असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्वाचे ठिकाण आहे, त्यामूळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहे. शहराप्रमाणेच या तालुक्यातील, माचणुर, हुलजंती,मारोळी ,लक्ष्मी-दहिवडी या ठिकाणांना सुद्धा धार्मिक महत्त्व आहे.
[संपादन] संताची भूमी
श्री संत दामाजी, संत कान्होपात्रा, श्री संत चोखामेळा, संत गोपाबाई, श्री. स्वामी समर्थ, बाबा महाराज आर्विकर, श्री. संत बागडे महाराज मारोळी , माचणुर, सिताराम् महाराज्,अशा थोर संत येथे होऊन गेले.
[संपादन] मल्टी-स्टेट,पतसंस्था
१ धनश्री मल्टी-स्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी ली.मंगळवेढा.
२ धनश्री महीला पथसंस्था.मंगळवेढा
[संपादन] बाह्य दुवे
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
||||||||||||||||