भक्तराज महाराज
दिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज (जुलै ७, १९२० - नोव्हेंबर १७, १९९५) हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते.
त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत[१], यांनी त्यांना 'भक्तराज' हे नाव दिले.
त्यांचे देशात व परदेशांत शेकडो भक्त आहेत. भक्तपरिवारात ते 'बाबा' या नावाने ओळखले जातात.
शिकवण
[संपादन]त्यांच्या संदेशाचे मुख्य सार म्हणजे : "भगवन्नामस्मरण व भजन यांद्वारे आनंदाचा अनुभव घ्या. सर्वांना भगवंतरूप व गुरूरूप मानून त्याग व निष्काम प्रेमाच्या माध्यमातून त्यांची सेवा करा."
याव्यतिरिक्त आत्यंतिक गुरुभक्ती व निष्ठा, भजनरचना व गायनाची अत्यंत आवड, भोजन उत्सव (भंडारा), भ्रमण ही त्यांच्या शिकवणुकीची इतर वैशिष्ट्ये आहेत.
आश्रम
[संपादन]भक्तराज महाराज ट्रस्ट यांचे, महाराष्ट्र व मध्य प्रदेश येथे प्रत्येकी दोन अधिकृत आश्रम आहेत :
- भक्तवात्सल्य आश्रम, इंदूर, मध्य प्रदेश
- सद्गुरू सेवा सदन, मोरटक्का, खांडवा , मध्य प्रदेश
- श्री भक्तराज महाराज समाधी मंदिर, कांदळी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
- मोरचुंडी आश्रम, मोरचुंडी, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र
उत्तराधिकारी
[संपादन]भक्तराज महाराजांचे गुरुबंधू 'रामानंदमहाराज' उर्फ 'रामजीदादा' हे त्यांची परंपरा पुढे चालवत आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ 'नाथ माझा भक्तराज'; लेखक: वि.मा. पागे; तिसरी आवृत्ती (२००६), (भक्तराज महाराज चरित्र)