धोतर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
धोतर म्हणजे कमरेवर पुरूषांनी नेसावयाचे तलम वस्त्र होय. हे महाराष्ट्रातील व भारतीय उपखंडातील पारंपरिक पेहरावांपैकी एक आहे. भारतीय उपखंडाबाहेर आग्नेय आशियातील थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या देशांतही हे काही प्रमाणात प्रचलित आहे.
धोतर म्हणजे चौकोनी आकाराचे, सुमारे ४.५ मीटर लांबीचे, सहसा सुती किंवा रेशमी कापड असते. कमरेवरून व पायांवरून लपेटून घेऊन, गाठ मारून कमरेपाशी बांधून ते नेसले जाते.
नेसण्याच्या पद्धती [संपादन]
- एकटांगी
- दुटांगी
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- धोतर कसे नेसावे ? (चलचित्र). यूट्यूब. (मराठी मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |