दिलीप पुरुषोत्तम चित्रे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| दिलीप पुरुषोत्तम चित्रे | |
| पूर्ण नाव | दिलीप पुरुषोत्तम चित्रे |
| जन्म | सप्टेंबर १७, १९३८ बडोदा, गुजरात, भारत |
| मृत्यू | डिसेंबर १०, २००९ |
| कार्यक्षेत्र | साहित्य, चित्रकला |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मराठी |
| साहित्यप्रकार | कथा, कविता, समीक्षा |
दिलीप पुरुषोत्तम चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत.
अनुक्रमणिका |
[संपादन] प्रकाशित साहित्य
[संपादन] मराठी
- कविता, मौज प्रकाशन, मुंबई, १९६०
- ओर्फियस, मौज प्रकाशन, मुंबई, १९६८
- शिबा राणीच्या शोधात, मेजेस्टिक, मुंबई, १९६९
- कवितेनंतरच्या कविता, वाचा प्रकाशन, औरंगाबाद, १९७८
- चाव्या; प्रास प्रकाशन, १९८३
- दहा बाय दहा, प्रास प्रकाशन, मुंबई, १९८३
- मिठू मिठू पोपट आणि..., साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९७९
- तिरकस आणि चौकस, लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९८०
- पुन्हा तुकाराम, १९९०; द्वितीय आवृत्ती: १९९५; तृतीय आवृत्ती: २००१
- शतकांचा संधिकाळ, लोकवाङ्मय गृह, मुंबई
- भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा( संपादित), लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९९५
- एकूण कविता-१, पॉप्युलर, मुंबई, १९९२; द्वितीय आवृत्ती: १९९५
- एकूण कविता-२, पॉप्युलर; मुंबई;1995
- एकूण कविता-३, पॉप्युलर
- चतुरंग, पॉप्युलर, १९९५
[संपादन] इंग्लिश
- An Anthology of Marathi Poetry (1945-1965) (Editor), Nirmala-Sadanand, Mumbai, 1968
- Ambulance Ride, Self, Mumbai, 1972
- Travelling In A Cage; Clearing House; Mumbai; 1980
- The Reasoning Vision: Jehangir Sabavala’s Painterly Universe, Introduction and Notes on the paintings by Dilip Chitre
- Tata-McGraw-Hill, New Delhi, 1980
- Tender Ironies: A Tribute To Lothar Lutze (Editor), Manohar, New Delhi, 1994
- Shri Jnandev’s Anubhavamrut: The Immortal Experience of Being, Sahitya Akademi, New Delhi, 1996
- The Mountain, Vijaya Chitre, Pune, 1998
- No-Moon Monday On The River Karha, Vijaya Chitre, Pune, 2000
- तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद - सेज् तुका
[संपादन] संपादन
- शब्द (त्रैमासिक) १९५४-१९६०
- New Quest (1978-1980), (2001-), Mumbai
[संपादन] स्तंभलेखन
- Free Press Journal, Mumbai(1959-1960)
- लोकसत्ता
- मुंबई दिनांक
- रविवार सकाळ
- New Quest
- अभिरुची
[संपादन] पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार १९९४: एकूण कविता -१ काव्यसंग्रहासाठी
[संपादन] इतर
- गोदान चित्रपटाची निर्मिती, पटकथा, दिग्दर्शन
- विजेता चित्रपटाची कथा, पटकथा