डग्लस अॅडम्स
| डग्लस अॅडम्स | |
| पूर्ण नाव | डग्लस नोएल अॅडम्स |
| जन्म | ११ मार्च, इ.स. १९५२ केंब्रिज, इंग्लंड |
| मृत्यू | ११ मे, इ.स. २००१ सांता बार्बरा, कॅलिफोर्निया, अमेरिका |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
| भाषा | इंग्लिश |
| साहित्यप्रकार | विज्ञान काल्पनिका, विनोदी साहित्य |
| प्रसिद्ध साहित्यकृती | द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी |
डग्लस नोएल अॅडम्स (इंग्लिश: Douglas Adams) (११ मार्च, इ.स. १९५२ - ११ मे, इ.स. २००१) हा ब्रिटिश लेखक व नाटककार होता. त्याची 'द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी' ही विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहे. इ.स. १९७८ साली पहिल्यांदा ती बीबीसीच्या रेडिओ कार्यक्रमाच्या स्वरूपात लोकांसमोर आली. नंतर ती पाच पुस्तकांच्या मालिकेच्या रूपात प्रसिद्ध झाली. डग्लसाच्या हयातीत या पुस्तकांच्या जवळपास दीड कोटी आवृत्त्या खपल्या, त्यावर एक दूरदर्शन मालिका निर्मिली गेली, अनेक रंगमंचीय प्रयोग, कॉमिकबुके, संगणक खेळ आणि इ.स. २००५ साली एक चित्रपट बनवला गेला.
अॅडम्साने डर्क जेंटली'ज होलिस्टिक डिटेक्टिव्ह एजन्सी(इ.स. १९८७), द लाँग डार्क टी-टाईम ऑफ द सोल (इ.स. १९८८) ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच, द मीनिंग ऑफ लाईफ(इ.स. १९८३), लास्ट चान्स टू सी(इ.स. १९९०), दूरदर्शन मालिका 'डॉक्टर हू'चे तीन भाग यांसाठी सहलेखन केले. त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या उर्वरित लिखाणाचा संग्रह, द साल्मन ऑफ डाऊट या नावाने इ.स. २००२ साली प्रकाशित झाला.
बाह्य दुवे [संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |