Jump to content

ज्योती सुभाष म्हापसेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jyoti Mhapsekar (it); জ্যোতি মহাপসেকর (bn); Jyoti Mhapsekar (nl); ज्योती सुभाष म्हापसेकर (mr); జ్యోతి మ్హప్‌సేకర్ (te); Jyoti Mhapsekar (en); Jyoti Mhapsekar (ast); Jyoti Mhapsekar (sq); ஜோதி மப்சேக்கர் (ta) Indian award winner (en); Indian award winner (en); attivista indiana (it); Indiaas bibliothecaresse (nl)
ज्योती सुभाष म्हापसेकर 
Indian award winner
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९५०, इ.स. १९४९
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

ज्योती सुभाष म्हापसेकर (जन्म : मुंबई, ८ फेब्रुवारी, इ.स. १९४९; - हयात) या एक मराठी साहित्यिक असून, त्यांनीच स्थापलेल्या स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

जीवन

[संपादन]

म्हापसेकरांचे वडील सुतारकाम करीत, तर आई शिक्षिका होत्या. त्यांच्या आईने गरीब वस्तीत दोन शाळा उघडल्या होत्या. ज्योती म्हापसेकर सुरुवातीला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर येथे ग्रंथपालाची नोकरी करीत होत्या. त्याच काळात त्यांनी स्त्री मुक्ती चळवळीवर लिखाण करायला सुरुवात केली. इ.स. १९७५ पासून त्यांचे 'मुलगी झाली हो' हे पथनाट्य गाजते आहे. रस्त्यावर कचरा उचलणाऱ्या स्त्रियांना संघटित करून त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल युनायटेड नेशन्सने घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌सने भरवलेल्या स्त्री-नाटककारांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

पथनाट्ये

[संपादन]
  • कथा रेशनच्या गोंधळाची
  • बापरे बाप
  • बेबी आयी है(हिंदी)
  • मुलगी झाली हो
  • हुंडा नको गं बाई

पुरस्कार

[संपादन]
  • इ.स. १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्र संघाकडून ज्योती म्हापसेकरांच्या 'कचरा वेचणाऱ्या बायकांच्या संघटने'ला खास दर्जा देण्यात आला.
  • महाराष्ट्र फाउंडेशनचा इ.स. २०११चा सामाजिक कार्याचा पुरस्कार
  • नारी शक्ती पुरस्कार

संदर्भ

[संपादन]