ज्यूविरोध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ज्यूविरोध (इंग्रजी: Antisemitism) हा शब्द ज्यू धर्मीय लोकांचा द्वेष अथवा तिरस्काराचे वर्णन करण्याकरिता वापरला जातो. जगाच्या इतिहासात आजवर ज्यूविरोधातून अनेक वेळा ज्यू लोकांसोबत हिंसा झाली आहे अ काही घटनांची परिणती शिरकाणांमध्ये झाली. नाझी जर्मनीमधील होलोकॉस्ट हे ज्यूविरोधाचे आजवर सर्वात मोठे उदाहरण आहे.
एका अंदाजानुसार जगातील ज्यूविरोध बळावतो आहे. मध्यपूर्वेमधील अनेक देश व राजकीय संस्था (इराण, सौदी अरेबिया, लेबेनॉन, पॅलेस्टाईन इत्यादी) उघडपणे कट्टर ज्यूद्वेष्ट्या आहेत. पाकिस्तान, सौदी अरेबिया व इतर मुस्लिम देशांमधील शालेयपुस्तकांमधून सर्रासपणे ज्यूविरोध शिकवला जातो आहे. २००० सालापासून युरोपातील अनेक देशांमधील नागरिकांचे मत ज्यू लोकांबद्दल प्रतिकूल बनत चालले आहे.
[संपादन] बाह्य दुवे
- ज्यूविरोधाच्या अभ्यासाचे जरनल [१]
- होलोकॉस्टमधील ज्यूविरोध
- आंतरराष्ट्रीय ज्यूविरोध
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत