जपानी लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जपानी लोक (जपानी: 日本人, निहोन्जीन / निप्पोन्जीन ;) हा जपानी द्वीपसमूहात व्युत्पती झालेला वांशिक गट आहे. जगभरात तब्बल १३ कोटी (मुख्यत्वे जपान:१२.७ कोटी ) वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. जपानाशिवाय अन्य देशांमध्ये राहणाऱ्या परदेशस्थ जपानी लोकांना जपानातील लोक निक्केइजिन म्हणतात. जपानी लोक या संकल्पनेमध्ये यामातो, ऐनू आणि रुक्युआन लोक हे उपवांशिक गटसुद्धा समाविष्ट आहेत.

संस्कृती[संपादन]

जपानी भाषा[संपादन]

हेसुद्धा पाहा: जपानी भाषा

जपानी भाषा ही कधी 'एकांतिक भाषा' या गटात मोडते, तर काहीवेळा तिचा रुक्युआन भाषा आणि अल्टेक भाषासमूह यांमध्ये समावेश केला जातो.

धर्म[संपादन]

हेसुद्धा पाहा: जपानमधील धर्म

बहुतकरून जपानी लोक निधर्मी आहेत वा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये धर्मांना जास्त महत्त्व नाही. पण एका सर्वेक्षणानुसार तब्बल ८४ % ते ९६ % लोक बौद्धशिंतो या जपानी स्थानिक धर्माच्या विचारधारणांमध्ये विश्वास ठेवतात.

फुशिमा इतरी येथील शिंटो स्तूपाचा मुख्य दरवाजा