जनक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेले विदेह देशाचे राजे होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्लेख रामायणात सीतेचा पिता व रामाचा सासरा म्हणून आला आहे.
इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचा आद्य पुरुष होता. या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली. मिथि जनकावरून या कुळास जनक हे नाव मिळाले.
हेही पाहा [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |